मध्य रेल्वेवर महाराष्ट्रात १८९५ कि.मी., मध्य प्रदेशात १४५ आणि कर्नाटकात १९३ कि.मी. ट्रॅकवरील विद्युतीकरण पूर्ण केले आहे. भारतीय रेल्वे हेड ऑन जनरेशन (एचओजी) प्रणालीदेखील सादर करीत आहे. या अंतर्गत लोकोमोटिव्हद्वारे ओव्हर हेड इक्विपमेंट (ओएचई) कडून थेट कोचला वीजपुरवठा केला जातो. यामुळे ट्रेनमध्ये स्वतंत्र ऊर्जा कारची आवश्यकता दूर होते. अतिरिक्त कोचची आवश्यकता कमी होते आणि कार्यक्षमता वाढते. पाॅवर कारचा वापर थांबविल्यास २३०० कोटी रुपयांच्या इंधनाची बचत होणार आहे.
चौकट==
सोलर एनर्जी, एलईडी
रेल्वेने पवन आणि सौर ऊर्जेचा वापर सुरू केला आहे. वीस हजारावर रेल्वे स्थानके व इमारतींमध्ये एलईडीकरण झाले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह पाच रेल्वे स्थानकांना इंडियन ग्रीन बिल्डिंग काउंसिलचे प्रमाणपत्र मिळाले आहे. १९ एप्रिल २१ पासून रेल्वेने १४३८ टॅंकरच्या ३५० हून अधिक ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्या चालवल्या आहेत. २४,३८७ टन ऑक्सिजन देशाच्या विविध भागात पोहोचविला आहे. महाराष्ट्रात ६१४ टन ऑक्सिजन दाखल झाला आहे.