नाशिका- शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असतानाच कोरोनामुक्त होणा-यांची संख्येत देखील लक्षणीय वाढ झालो असून मंगळवारी (दि.६) ३३४ रूग्ण बरे झाल्याने एकुण बरे झालेल्यांची संख्या पन्नास हजारावर गेली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात ५८९ नवे कोरोना बाधीत आढळले आहेत. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे.नाशिक शहरात ६ एप्रिल रोजी पहिला कोरोना बाधीत रूग्ण आढळला. त्यानंतर रूग्ण संख्या वाढत गेली. जून महिन्यापर्यंत ही संख्या मर्यादीत होती. मात्र नंतर लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर आरोग्य नियमांचे पालन नागरीकांनी न केल्याने बाधीतांची संख्या वाढत गेली. गेल्या महिन्यापर्यंत शहरात समुह संसर्ग झाल्याची स्थिती होती आणि रूग्ण संख्या दिवसाकाठी आठशे ते नऊ शे इतकी होती. मृत पावणा-यांची संख्या देखील वाढत गेल्याने चिंतेचे वातावरण होते. मात्र, गेल्या आठवडाभरापासून रूग्ण संख्या कमी झाली आहे त्यातचदिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढतच आहे. शहरात कोरोना बाधीतांची संख्या ५५ हजार पार झाली आहे. परंतु रूग्ण बरे होणा-यांची संख्या देखील ५० हजाराच्या वर गेली आहे. सध्या उपचार घेणा-यांची संख्या ४ हजार २८५ इतकी आहे.दरम्यान, गेल्या चोवीस तासात सात जणांचा मृत्यू झाला आहे. यात कौट घाट येथील ७१ वर्षीय वृध्द महिला, भाभा नगर येथक्षल ६८ वर्षीय रूग्ण, कॉलेजरोडवरील येवलेकर मळा येथील ४५ वर्षीय पुरूष, पंचवटीत उदय नगर येथील ६५ वर्षीय वृध्द, नाशिकरोड येथील कॅनॉल रोडवरील ७० ववर्षीय वृध्द महिला तसेच सातपूर येथील ६४ वर्षीय पुरूण आणि सिडकोतील ७० वर्षीय वृध्द महिलेचा समावेश आहे.रूग्णालयात १ हजार खाटा शिल्लकगेल्या सप्टेंबर महिन्यात शहरात २६ हजार २१ रूग्णांची भर पडली आहे तर २४७ रूग्णांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत. शहर वासियांच्या वतीने आॅगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने अत्यंत कठीण होते. मात्र आता दिलासा मिळताना दिसत आहे. आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रूग्ण संख्या चार हजारावर आहे. तथापि, आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ही संख्या कमी आहे.महापालिकेने शहरात पंधरा पेक्षा अधिक बेड असलेली रूग्णालये कोरोना बाधीतांच्या उपचारासाठी घेतली. मात्र, ११८९ पैकी सध्या १ हजार ४४ बेडस शिल्लक आहेत.