सातपूर : येथील अशोकनगर स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात दुपारच्या सुमारास एका भामट्याने चाकूचा धाक दाखवून ग्राहक केंद्रातील तरु णीकडून पन्नास हजारांची जबरी लूट केली. दिवसाढवळ्या झालेल्या या दरोड्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या तरुणीने दरोडेखोरांबरोबर झटापट केली. परंतु पैसे घेऊन जाण्यास दरोडेखोर यशस्वी झाला.अशोकनगर येथील स्टेट बँकेशेजारी कोठावदे किराणा सेंटरच्या वर असलेल्या स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात नेहमीच गर्दी असते. शुक्र वारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ग्राहक केंद्रातील सविता मुर्तडक यांचे पती सागर मुर्तडक हे भरणा करावयास गेले असता एक अज्ञात इसम या केंद्रात आला. त्यावेळी सविता मुर्तडक एकट्याच होत्या. या इसमाने प्रवेशद्वारातील मुख्य दरवाज्याची आतून काडी लावून घेतली. खिश्यातून चाकूचा धाक दाखवून ड्रॉवरमधील सुमारे पन्नास हजार रु पयाची लूट करून पलायन केले. दरम्यान, एकट्या सविता मुर्तडक यांनी दरोडेखोराला दहा मिनिटे शर्थीचे प्रयत्न करून विरोध केला.या ग्राहक केंद्रात दीड वर्षांपूर्वी याच काउंटरवरून एका अज्ञात भामट्याने दिवसाढवळ्या पन्नास हजारांची रोकड घेऊन लूट केली होती. दुसऱ्या घटनेत या केंद्रात काम करणाºया कर्मचाºयाने पैसे घेऊन फरारदेखील झाला होता आणि कर्मचाºयाने मालकाची दिशाभूल करून पैसे चोरीला गेले असल्याचा बनावदेखील केला.
एसबीआयच्या ग्राहक सेवा केंद्रात ५० हजारांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:49 AM