शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

गंगापूर धरणात ५१ टक्के पाणीसाठा

By admin | Published: March 20, 2017 9:21 PM

अपव्यय करणाऱ्यांवर होणार कारवाई.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २० मार्चअखेर ५१ टक्के पाणीसाठा शिल्लक

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २० मार्चअखेर ५१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, पाणीसाठा पुरेसा असला तरी उन्हाळ्यात पाणीबचतीचे आवाहन महापालिकेने केले आहे. याशिवाय, पाण्याचा गैरवापर व अपव्यय करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेला दि. १५ आॅक्टोबर २०१६ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीसाठी गंगापूर धरणात ३९०० दलघफू तर दारणातील ४०० दलघफू याप्रमाणे एकूण ४३०० दलघफू पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत गंगापूर धरणातील सुमारे १५५० दलघफू पाणी आरक्षण शिल्लक आहे. सदर पाणीसाठा महापालिकेला ३१ जुलैपर्यंत पुरवायचा आहे. २० मार्चअखेर गंगापूर धरणात २८६३ दलघफू म्हणजे ५१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर धरण समूहातील काश्यपी धरणात १७७७ दलघफू म्हणजे ९६ टक्के, गौतमी गोदावरीत २९७ दलघफू म्हणजे १६ टक्के तर आळंदीत ४६४ दलघफू म्हणजे ४८ टक्के पाणीसाठा आहे. एकूण गंगापूर धरणसमूहात ५४०१ म्हणजे ५२ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी २० मार्चअखेर गंगापूर धरणात १७३९ दलघफू म्हणजे अवघा ३१ टक्के पाणीसाठा होता, तर धरणसमूहात अवघा २६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा गंगापूर धरणात जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याचे जिल्हा प्रशासन व महापालिकेमार्फत सांगितले जात असले तरी दुसरीकडे पाणीबचतीचेही आवाहन केले जात आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत गंगापूर धरणातून रोज सुमारे ४१५ ते ४२० दशलक्ष लिटर्स पाण्याची उचल केली जात आहे. याशिवाय, कडक उन्हामुळे बाष्पीभवनाचाही वेग वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.