नाशिक : जुलै ते डिसेंबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्'ातील ५१७ ग्रामपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना व आरक्षण कार्यक्र म जाहीर केला असून, त्यानुसार मंगळवारी प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार गुरुवार १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीची लोकसंख्या गृहीत धरून सदस्य संख्या ठरविण्यात आली व त्यानुसार नियम ३ प्रमाणे प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली होती. मंगळवारी त्याला मान्यता देण्यात आली असून, प्रभाग रचनेबाबत हरकती सादर करण्याची अंतिम मुदत गुरु वार दि. ५ फेब्रुवारीपर्यंत आहे, तर बुधवार दि. २८ जानेवारी, रोजी प्रभागाचे आरक्षण सोडत केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती, सूचना प्राप्त झाल्यावर त्यावर सोमवार ९ फेबुवारी रोजी निर्णय घेण्यात येईल. अंतिम प्रभाग रचना १३ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत मुदत संपणाऱ्या या तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे आहे. बागलाण - ३८, चांदवड - ५५, देवळा - १०, दिंडोरी - १७, इगतपुरी - ३, मालेगाव - ९९, नांदगाव - ५९, नाशिक - २३, निफाड - ६५, सिन्नर - १०१, त्र्यंबकेश्वर - ३, येवला ४४ अशी आहे.
५१७ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर
By admin | Published: January 21, 2015 2:00 AM