सिन्नर : कोरोनाच्या संसर्गामुळे सुरू असलेले लॉकडाउन उद्योगांसाठी २० एप्रिलपासून शिथिल करण्यात आले असले तरी कारखाने सुरू करण्यासाठी शासनाने घातलेल्या अटी-शर्ती उद्योजकांना जाचक वाटत आहेत. परिणामी सिन्नरच्या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये केवळ ८५ च्या आसपासच कारखाने सुरूहोऊ शकलेले आहेत. त्यात माळेगावच्या शासकीय औद्योगिक वसाहतीतील २५ तर मुसळगावच्या सहकारी वसाहतीतील ६० कारखान्यांचा समावेश आहे.उद्योजकांना कारखाने सुरू करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या २३ अटी-शर्तींचेकाटेकोर पालन करावे लागणार आहे. त्यात कारखाना परिसर,माल वाहतूक तसेच कामगारांची वाहतूक करणाऱ्या बसेसचे सॅनिटायझिंग करणे, कामगारांना सॅनिटायझर पुरविणे, त्यांच्या शरीराचे तापमान तपासून नोंदी ठेवणे, बसने वाहतूक करणे,किंंवा कारखान्यातच राहण्याची व्यवस्थ करणे अशाअनेक अटी-शर्तींचा समावेश आहे. त्यामुळे खर्चात मोठी वाढहोणार असल्याने उद्योजकांनी ३ मेपर्यंत वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर १७-१८ कारखाने पूर्ववत सुरू होऊ शकले आहेत. इतरांना अटी-शर्ती शिथिल होण्याची प्रतीक्षा आहे.
मुसळगावला ५२, तर माळेगावी २५ कारखाने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:23 PM