योगेंद्र वाघ।लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील सातत्याने दुष्काळी भागातील टंचाईग्रस्त असलेल्या ३८ गावांसाठी अस्तित्वात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे तालुक्यातील ५२गावे टँकरमुक्त झाले आहेत.तालुक्यातील धानोरे, धूळगाव, पिंपळगाव लेप, शिरसगाव लौकी, एरंडगाव बु॥, एरंडगाव खु., जळगाव नेऊर, नेवरगाव, मानोरी, देशमाने, बाभूळगाव बु॥, बाभूळगाव खु., अंगणगाव, साताळी, निमगाव मढ, कुसूर, अनकुटे, धामोडे, सावरगाव, विसापूर, विखरणी, कातरणी, सोमठाण देश, अंदरसूल, गवंडगाव, उंदीरवाडी, आडगाव चोथवा, पिंपळगाव जलाल, नांदेसर, नगरसूल, सायगाव, भारम, न्याहारखेडा बु॥, न्याहारखेडा खु. पिंपळखुटे बु॥, पिंपळखुटे खु., सुरेगाव रस्ता, भायखेडा ्रआदी ३८ गावे टँकरमुक्त झालीआहेत. यात १४ गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर दरवर्षी होणारा लाखोंचा खर्च वाचवण्यासाठी नळपाणी पुरवठा योजना अस्तित्वात आली. या योजनेतील समाविष्ट ३८ गाव टँकरमुक्त झाल्याने या गाव परिसरातील इतर गावेही यापाणी योजनेत समाविष्ट करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होऊ लागली आहे.-------शासनाचा खर्च वाचलाटप्प्याटप्प्याने या योजनेत अंतरवेली, सातारे, चिचोंडी खुर्द, चिचोंडी बुद्रुक, तळवाडे, बाळापूर, आंबेवाडी, आडगाव रेपाळ, मुरमी, निळखेडे, गुजरखेडे, गोपाळवाडी, साबरवाडी (देवरगाव), अंगुलगाव ही १४ गावे नव्याने समाविष्ट केली गेली. या योजनेमुळे आता तालुक्यातील ५२ गाव टँकरमुक्त झाली आहेत. परिणामी शासनाचा टँकरवर होणारा लाखो रुपयांचा खर्चही वाचला आहे. या ५२ गावांतील ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी घरपोहोच उपलब्ध झाले आहे. लवकरच या योजनेत अनकाई या गावाचाही समावेश होणार आहे.--------ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर विशेष लक्ष द्या, गाव टँकरमुक्त होण्यासाठी प्रथम प्राधान्य द्या, अशा सूचना आमदार छगन भुजबळ यांनी केल्या आहेत. भुजबळ यांच्या मार्गदर्शनाने योजनेचे काम सुरळीत सुरू आहे.- मोहन शेलार, उपाध्यक्ष, ३८ गाव नळ पाणीपुरवठा योजना
येवला तालुक्यातील ५२ गावे टॅँकरमुक्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 8:54 PM