शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

जिल्ह्यात ५२०६ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:14 AM

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी (दि.३०) एकूण ३७४९ इतक्या रुग्णांची वाढ झाली तर सुमारे दीडपट अधिक म्हणजे ५२०६ ...

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी (दि.३०) एकूण ३७४९ इतक्या रुग्णांची वाढ झाली तर सुमारे दीडपट अधिक म्हणजे ५२०६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ४० नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३४९७वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये १८२०, तर नाशिक ग्रामीणला १८२१ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ८४ व जिल्हाबाह्य २४ रुग्णबाधित आहेत तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात २४, ग्रामीणला १४ , मालेगाव मनपा १ आणि जिल्हाबाह्य १ असा एकूण ४० जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. गत पंधरवड्यापासून मृतांची संख्या सातत्याने चाळीसच्या आसपास राहात आहे. तरीदेखील नागरिक निर्बंधांबाबत तितकेसे दक्ष दिसून येत नसल्याने अजून कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

इन्फो

उपचारार्थी ४० हजारांवर

जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी अधिक आली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ४०,८१६ वर पोहोचली आहे. त्यात २२ हजार ४७४ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, १६ हजार ३७७ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, एक हजार ७२० मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य २४५ रुग्णांचा समावेश आहे.

इन्फो

बाधितांमध्ये ग्रामीण पुढे

जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत सातत्याने नाशिक शहरच आघाडीवर रहात होते. मात्र, शुक्रवारी ग्रामीणची बाधित संख्या १८२१ अशी केवळ एका रुग्णसंख्येने पुढे आहे. मात्र, ग्रामीणमधील बळींचा आकडा गत तीन दिवसांच्या तुलनेत नाशिक शहरापेक्षा काहीसा कमी झाला आहे.