नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाची रु ग्णसंख्या आता झपाट्याने वाढू लागली आहे. रविवारी (दि.३०) नव्याने १ हजार १७० नवे रु ग्ण आढळून आले. एकूण रु ग्णसंख्या ३६ हजार ४९० इतकी झाली आहे. दिवसभरात ६ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.सर्वाधिक ७९७ रु ग्ण केवळ नाशिक शहरात मिळून आले असून शहरात उपचारार्थ दाखल १ रु ग्ण रविवारी मृत पावला. मृतांचा आकडा यामुळे कमी होण्यास मदत झाली. मागील दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी रु ग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण कमी राहिल्याने काहीअंशी दिलासा मिळाला. जिल्ह्यात दिवसभरात ५३४ रु ग्ण कोरोनावर मात करु शकले. मागील पाच दिवसांपूर्वी कोरोनाबधित रु ग्णांचा आकडा घसरला होता; मात्र अचानकपणे कोरोना रु ग्णांच्या संख्येत आता पुन्हा वाढ होऊ लागल्याने आकडेवारीवरून दिसत आहे. दिवसभरात जिल्हयात ९९५ संशयित रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी ८०२ रु ग्ण शहरातील आहे. तसेच शहरात रविवारी कोरोनाचे ७९७ रु ग्ण मिळून आले.शहरवासीयांकरिता कोरोनासंक्र मणाचा धोका अधिकच वाढला आहे. नाशिक ग्रामीणच्या तुलनेत शहरात स्थिती अधिक भयावह होत चालली आहे. नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.जिल्ह्यातील वाढत्या रु ग्णसंख्या नियंत्रणात आणताना प्रशासनाची चांगलीच धावपळ होत आहे. सध्या जिल्ह्यात आतापर्यंत २८ हजार ५१२ रु ग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तसेच ७ हजार ११६ रु ग्ण उपचार घेत आहेत. ९० हजार ८७३ लोकांचे नमुना चाचणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
५३४ रुग्णांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 1:57 AM
जिल्ह्यातील कोरोनाची रु ग्णसंख्या आता झपाट्याने वाढू लागली आहे. रविवारी (दि.३०) नव्याने १ हजार १७० नवे रु ग्ण आढळून आले. एकूण रु ग्णसंख्या ३६ हजार ४९० इतकी झाली आहे. दिवसभरात ६ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ठळक मुद्देसहा बळी : जिल्ह्यात १ हजार १७० कोरोनाचे रु ग्ण