नाशिक : जिल्ह्यात आजपर्यंत ६५ हजार ६३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ५४ हजार ६०१ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९ हजार ६२८ रु ग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.१२ टक्के इतके आहे. आतापर्यंत १ हजार १९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सोमवारी (दि.२१) जिल्ह्यात कोरोनामुळे १७ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात १ हजार ६१ नवे रुग्ण आढळून आले आहेत.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे; परंतु अशाही परिस्थितीत आरोग्य विभाग व प्रशासनाच्या नियोजनामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील दिसून येत आहे. त्यामुळेच नाशिक जिल्ह्यात सोमवारी १४०० रूग्ण बरे होऊन घरी परतले असून, १०६१ नवीन रुग्ण दाखल झाले आहेत.विभागात आतापर्यंत १ लाख ६१ हजार ५१८ रुग्णांपैकी १ लाख ३२ हजार २७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, सद्य:स्थितीत २६ हजार १७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत विभागात ३ हजार ३१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सिन्नर तालुक्यात सोमवारी ३९ बाधित आढळून आल्याने रुग्णसंख्या २१८६ झाली आहे. १६९० रुग्णांनी कोरोना मात केली आहे. येवला तालुक्यात सोमवारी १० अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ६३६ झाली असून, आजपर्यंत ५१८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
जिल्ह्यात ५४ हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 1:37 AM