नामपूर/द्याने : बागलाण तालुक्यातील काटवण भागातील चिराई, महड, बहिराने या गावांत कुल्फी खाल्ल्याने सुमारे ५५ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली असून, कुल्फी विक्रेत्यास नामपूर पोलिसानी ताब्यात घेतले आहे. विष बाधितांवर नामपूर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी (दि.२४) दुपारी अखिलेशकुमार रामप्रसाद कुमावत हा मटका कुल्फी विक्र ी करत होता. यात नेहमीप्रमाणे चिराई, महड, बहिराने या गावातील लहान मुले, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक असा सर्वच वयोगटातील सुमारे ५० ते ६० जणांनी कुल्फी खाल्ली. यात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सर्वांना मळमळ, उलटी, जुलाब, चक्कर येण्यास सुरुवात झाली. यात रात्री उशिरा खासगी वाहनाने तत्काळ पुढील उपचारासाठी नामपूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. यात साधारणत: सुमारे ५५ रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी डॉ.एन. एम. भामरे, डॉ. योगेश मोराणे, डॉ. मंडावत यांनी तातडीने उपचार सुरू केले. योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे विषबाधित रु ग्णाची प्रकृती ठीक असून, घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, श्रीराम कोळी यांच्यासह नामपूर परिसरातील विविध सामाजिक, राजकीय नेत्यांनी ग्रामीण रुग्णालयात रु ग्णाची विचारपूस केली. चिराईच्या सरपंच शकुंतला पाटील यांनी कुल्फी विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रुग्णालयात गर्दी झाली असून, येत्या दोन दिवसात सर्व रुग्णांची तपासणी करून घरी पाठवण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. (वार्ताहर)रुग्णालयात प्रत्येक खाटेवर दोन-दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात सिंधूबाई लोटन आहिरे (५५), भरत दगा आहिरे (३३), चेतन भरत आहिरे (५), कुसुमबाई दगा आहिरे (४५), सोनाली भरत आहिरे (२२), कल्पना पावला खैरनार (२४), पृथ्वीराज पावला खैरनार (४), नंदिनी जनक निकुंभ (४०), सुनीता भास्कर शिंदे (२२), हर्षदा भास्कर शिंदे (६), निकीता गुलाब आहिरे (१०), मनोहर मधुकर धोंडगे (१०), इशांत विनायक धोंडगे (८), वैष्णवी विनायक धोंडगे (१०), प्रसाद दादाजी धोंडगे (६), मेघश्याम दादाजी धोंडगे (४), गिरीश वाल्मीक धोंडगे (९), भैरव वाल्मीक धोंडगे (६), अमोल शरद सोनवणे (५), गोकुळ शरद सोनवणे (४), नंदिनी दादाजी आहिरे (४), धनश्री दादाजी आहिरे (२), मोहित संजय आहिरे (१३), भावेश किशोर आहिरे (१०), लोकेश किशोर आहिरे (१३), इंद्रजित हरी आहिरे (१३), गजानन विलास आहिरे (१२), रोशनी तुकाराम आहिरे (१३), कल्यानी विजय आहिरे (९), पूजा संजय आहिरे (११), प्रशांत सदाशिव जाधव (१२), सनी सदाशिव जाधव (१०), मंगला सदाशिव जाधव (३०), महेश कौतिक आहिरे (८), सोनाली कौतिक आहिरे (२२), सरला दिलीप आहिरे (१४), नयना दिलीप आहिरे (९), सोनाली दिलीप आहिरे (१२), दीपाली दिलीप आहिरे (१४), माधुरी दिलीप आहिरे (६), अर्चना अशोक आहिरे (१३), सुमन हरिभाऊ बोरसे (४०), वैशाली अशोक आहिरे (१२), लकी युवराज आहिरे (५), सुवर्णा चिंतामण आहिरे (२२) या सर्वांना उपचारासाठी नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सटाणा तालुक्यात कुल्फी खाल्ल्याने ५५ जणांना विषबाधा
By admin | Published: March 25, 2017 11:16 PM