शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

मिशन झीरोअंतर्गत चार दिवसात नाशकात ५५५७ अ‍ॅँटिजेन टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 7:02 PM

नाशिक : मिशन झीरो नाशिक अंतर्गत नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी आणि विविध स्वयंसेवी व्यक्ती, संस्था यांच्या प्रयत्नाने महानगरात तब्बल ५७५७ रु ग्णांच्या अ‍ॅँटीजेन चाचण्या करून ५३३ बाधित रु ग्ण शोधण्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

ठळक मुद्दे५३३ बाधित रु ग्णकोरोनाचा प्रसार रोखण्यात मोलाची भूमिका

नाशिक : मिशन झीरो नाशिक अंतर्गत नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी आणि विविध स्वयंसेवी व्यक्ती, संस्था यांच्या प्रयत्नाने महानगरात तब्बल ५७५७ रु ग्णांच्या अ‍ॅँटीजेन चाचण्या करून ५३३ बाधित रु ग्ण शोधण्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. प्रशासनाबरोबरच बीजेएसच्या अ‍ॅँटिजेन चाचण्या वाढत असून त्या प्रमाणात पॉझिटीव्ह रु ग्णदेखील अधिकाधिक संख्येने मिळत आहेत. अशा पद्धतीने पॉझिटीव्ह रु ग्णांना लवकर शोधून काढणे हा कोरोना प्रसार रोखण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे. अशा संशयित आणि बाधित रुग्णांवर योग्य ते उपचार करणे, समुपदेशन करणे यामुळे रु ग्ण लवकर बरे होतील व त्याबरोबरच पुढील होणारे संक्र मणही थांबवता येईल.पहिल्याच दिवशी ६६, दुसऱ्या दिवशी १०५, तिसºया दिवशी १६१ व चौथ्या दिवशी २०१ अशा चढत्या क्र माने पॉझिटीव्ह रु ग्ण हुडकून काढण्यात यश आले आहे. फक्त चारच दिवसात ५७५७ व्यक्तींच्या अँटिजेन टेस्ट करून ५३३ पॉसिटीव्ह रु ग्णांना शोधून काढण्यात मिशन झीरो नाशिक या अभियानात यश मिळाले आहे.मिशन झीरो नाशिक या एकात्मिक कृती योजनेच्या चौथ्या दिवशी महानगरपालिकेने आखून दिलेल्या जुने नाशिक, फुलेनगर, शिवाजी चौक, दसक पचक, समतानगर-टाकळी, मोरेमळा-रामवाडी, कामटवाडे, अशोकनगर-सातपूर, दत्तनगर, बिडीकामगार, पवारवाडी, संजयनगर-वाल्मीकनगर, कालिकानगर-फुलेनगर, राणाप्रताप चौक, सिन्नर फाटा, हिरवाडी, आर्टिलरी सेंटर-जय भवानी रोड, पाथर्डी-दोंदे मळा या कंटेन्मेंट झोनमध्ये मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅनद्वारे रु ग्णांच्या अँटिजेन चाचणी करण्यात आल्या . त्यापैकी पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रु ग्णांना गृह विलगीकरण किंवा कोविड केअर सेंटरमध्ये पुढील उपचाराची व्यवस्था करण्यात आली. आजच्या मिशन झीरो नाशिक मध्ये महानगरपालिका चे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, पोलीस आयुक्तालय, भारतीय जैन संघटनेचे कार्यकर्ते सैफी अ‍ॅम्बुलन्स कॉर्पसचे सेवाभावी कार्यकर्ते, गुरु द्वारा नाशिकरोड, डॉक्टर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशिअन, आशा सेविका, शिक्षिका हे सहभागी होत आहेत. नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन मोफत अँटिजेन चाचण्या करून घ्याव्यात व कोविड मुक्त नाशिकच्या अभियानाला सहकार्य करावे असे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी, आयुक्त राधाकृष्ण गमे, बीजेएसचे प्रकल्प समन्वयक नंदकिशोर साखला, दीपक चोपडा, वॉटरग्रेसचे चेतन बोरा, डॉ. उल्हास कुटे यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक