नाशिक : शहर व परिसरात गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने सातत्याने नायलॉन मांजाची चोरीछुपी विक्री रोखण्यासाठी छापेमारीचा धडाका सुरू केला आहे. दिंडोरी रोडवरील कलानगरमधून सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे ५७ गट्टू पोलिसांच्या पथकाने छापा मारून जप्त केले आहेत. या युनिटकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या विविध कारवायांमध्ये सुमारे २ लाख १४ हजार रुपये किमतीचे ३८९ गट्टू (फिरक्या) जप्त करण्यात आल्या आहेत.दिंडोरी रोडवरील कलानगर भागात चोरट्या मार्गाने नायलॉन मांजाची सर्रासपणे विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली यानुसार पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, गौरव खांडरे, प्रवीण चव्हाण यांच्या पथकाने कलानगर येथील साई रेसिडेन्सी रो-हाऊसच्या परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित सूरज फकिरा खोडे (२७, रा. कलानगर) हा नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी आल्याने पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून नायलॉन मांजाचे ५८ गट्टू मिळून आले. संशयित खोडेविरोधाात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायलॉन मांजाविक्री व वापरावर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत बंदी घातली आहे.
पंचवटीतून नायलॉन मांजाचे ५७ गट्टू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:22 AM
शहर व परिसरात गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने सातत्याने नायलॉन मांजाची चोरीछुपी विक्री रोखण्यासाठी छापेमारीचा धडाका सुरू केला आहे. दिंडोरी रोडवरील कलानगरमधून सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे ५७ गट्टू पोलिसांच्या पथकाने छापा मारून जप्त केले आहेत.
ठळक मुद्देधडक कारवाई : शहरात सातत्याने छापेमारी