नाशिक : कालिका देवी मंदिर ट्रस्ट आणि क्रीडा संस्कृती फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी नाशिक जिल्ह्यातील ५७ मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक उपस्थित होते. यावेळी बोलताना तांबे यांनी सांगितले, शिक्षक हा समाजाच्या जडण-घडणीमधील सर्वाधिक महत्त्वाचा घटक असल्याचे नमूद केले. मान्यवरांच्या हस्ते सत्कारार्थींना पुष्पगुच्छ, पुस्तक, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव पाटील, सचिव डॉ. प्रताप कोठावळे, दे. ना. पाटील शिक्षण संस्थेचे संचालक मुरलीधर पाटील, जिल्हा परिषेदेच्या सदस्या ज्योती जाधव, क्रीडा संघटक अशोक दुधारे, आनंद खरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिक्षणाची जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडणाऱ्या शिक्षक, मुख्याधापयाक, प्राचार्य यांच्या योगदानाची माहिती अस्मिता मोगल आणि विजया दुधारे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद खरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय खरे यांनी केले, तर आभार श्याम मोरे यांनी मानले.
फोटो
०६टीचर