नाशिक : काेरोना बळींनी रविवारी (दि. १८) पुन्हा ४० आकडा गाठल्याने आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २९३५ वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने पुन्हा पाच हजारांचा आकडा ओलांडून एकूण ५७४९ पर्यंत मजल मारली आहे.जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ३३६५ तर नाशिक ग्रामीणला २२४९ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ५० व जिल्हाबाह्य ८५ रुग्ण बाधित आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १७, ग्रामीणला २१, तर मालेगाव मनपा क्षेत्रात २ अशा एकूण ४० जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. गत पंधरवड्यापासून मृतांची संख्या सातत्याने तीसहून अधिक राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यापेक्षाही कठोर उपाययोजनांच्या अंमलबजावणीची आवश्यकता असल्याचा सूर नागरिकांकडूनच व्यक्त होऊ लागला आहे. उपचारार्थी ३८ हजारांवरजिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ३८ हजार ४६७ वर पोहोचली आहे. त्यात २१ हजार ४२४ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, १४ हजार ९५१ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, १ हजार ९१८ मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य १७४ रुग्णांचा समावेश आहे. दररोज वाढत असलेल्या नमुन्यांमुळे कोरोना काळात प्रलंबित अहवालांची संख्या मोठीच राहत आहे. त्यात सर्वाधिक प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणचे ३५२० आहे.
जिल्ह्यात दिवसभरात ५७४९ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 1:35 AM
काेरोना बळींनी रविवारी (दि. १८) पुन्हा ४० आकडा गाठल्याने आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २९३५ वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने पुन्हा पाच हजारांचा आकडा ओलांडून एकूण ५७४९ पर्यंत मजल मारली आहे.
ठळक मुद्देप्रलंबित अहवालांची संख्या सात हजारांवर