यंदा मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी हंगामातील पिकांची जोरदार तयारी सुरू असली तरी पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या थंडीने आठ दिवसापासून पाठ फिरवल्याने पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होत आहे. शिवाय थंडी गेली आणि ढगाळ हवामान झाल्यास पिकांवर मावा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. मावा वाढला की पिकांची वाढ थांबते. कांदे आणि गव्हाच्या पिकासाठी जोरदार थंडीची आवश्यकता आहे; मात्र थंडी नसल्याने पिके १५ दिवसांची लागवड होऊनही जमीन सोडायला तयार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
नाशिक जिल्ह्यात बागलाण, येवला, सिन्नर, चांदवड भागांमध्ये पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे तर नाशिक, निफाड, दिंडोरी या भागांमध्ये पेरणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत गव्हाची ४४ टक्के, मका ८४ टक्के, हरभऱ्याची ५२ टक्के तर ज्वारीची १९ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात येत्या आठवड्यामध्ये १०० टक्के रब्बी हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत पूर्ण झालेल्या पेरण्या (हेक्टरमध्ये)
तालुका / सरासरी क्षेत्र / झालेली पेरणी / टक्के
निफाड : १७८१ ९६९ ११३९
बागलाण : ११७२ ५१०२ ८५८७
मालेगाव : ८०७० ७२१३ ८९
पेठ : १७०५ ९८१ ३७
सिन्नर : १७१०९ १०५४१ ५७
येवला : १०९६७ १०३४७ ५८
नांदगाव : ५१४३ ५१२६ १०१
चांदवड : ७१२० २१५३ ४१
दिंडोरी : १०८८६ ६३२४ ५८
नाशिक : ३६८० ३०५० ८४
सुरगाणा : २८०३ १२०८ ४३
त्र्यंबकेश्वर : २०९७ ५०८ २३
कळवण : ७९९३ २०८३ ३५
देवळा : २७१३ ७४१ ३०