नाशिक : महाराष्ट्र शासन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,नाशिक विभाग आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय),सातपूर, नाशिक यांनी रविवारी (दि.10)आयोजित केलेल्या रोजगार व उद्योजकता मेळाव्यात 595 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली आहे.नाशिक विभागीय कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मेळाव्याचे उदघाटन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा याच्या हस्ते झाले. व्यासपीठावर आयटीआयचे प्राचार्य एस. एम. कदम, उपप्राचार्य. एस. एस. भामरे, आयटीआय देवळाचे प्राचार्य चेतन बुरकुल आदि उपस्थित होते. रोजगार मिळविण्यासाठी उपस्थित उमेदवारांना संतोष मंडलेचा यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, उमेदवारांनी मोठया कंपनीत नोकरी मिळविण्याचा अट्टाहास न करता मध्यम-छोट्या कंपनीमध्ये नोकरी करून करून कामाचा अनुभव घ्यावा आणि स्वत:च्या कौशल्यात वाढ करावी. तर तरुणांनी मिळेल ते काम करण्यास सुरुवात करून अनुभव घेणो आवश्यक आहे. असे काम करण्याच्या अनुभवामुळे बहुआयामी कामाची संधी मिळते, या कामाच्या माध्यमातून मिळणा:या अनुभवातून स्वत:चा विकास करून उद्योजक व्हावे असे आवाहन निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी उपस्थित उमेदवारांना केले. आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी प्रत्येकाने आपल्यातील कौशल्याचा शोध घेऊन स्वयंरोजगार करावा आणि नोकरी करणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावे असे मत व्यक्त केले. यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहायक संचालक मनीष बोरूळकर यांनीही उमेदवारांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी ह्युमन रिसोर्स रिसर्च एण्ड डेव्हलपमेंट सेंटरचे मंगेश भणगे यांनी मुलाखतीचे तंत्र उमेदवारांना समजावून सांगितले. प्रास्ताविक कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता नाशिक विभागाचे उपसंचालक सुनील सैदाने यांनी केले. सूत्रसंचालन रजनी वाघ यांनी केले. सहायक संचालक संपत चाटे यांनी आभार मानले.यावेळी कौशल्य विकास व रोजगार अधिकारी शंकर जाधव, अख्तर तडवी, अशोक चव्हाण, एस. एम. पाटील, संजीवनी नाईकवाडे, बी.जे. जाधव, प्रदीप गावित व अन्य कर्मचारी आणि आयटीआयचे गट निदेशक प्रशांत बडगुजर व सहकारी उपस्थित होते.23 कंपन्यांचा सहभागकौशल्य विकास व रोजगार मेळाव्यात 23नामांकित उद्योजक कंपन्यानी 749 रिक्त जागांसाठी सहभाग नोंदविला होता. यापैकी 18 नियोक्त्यांनी उपस्थित राहून 835 उमेदवारांच्या मुलाखती घेत 595 उमेदवारांची प्राथमिक निवड केली. यावेळी खादी ग्रामोद्योग, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, अपंग, इतर मागासवर्ग या महामंडळाने दालने लावून माहिती व मार्गदर्शन केले. स्वयंरोजगारासाठी 150 उमेदवारांनी इच्छुक म्हणून नोंदणी केली. महाबँक आरसेटी यांनी उद्योजकता विकास या मोफत प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन करून 52 उमेदवारांची नोंदणी केली.
नाशिक विभागीय रोजगार, उद्योजकता मेळाव्यात 595 उमेदवारांची निवड, तर स्वयं रोजगारासाठी 150 उमेदवारांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 5:50 PM
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,नाशिक विभाग आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय),सातपूर, नाशिक यांनी रविवारी (दि.10)आयोजित केलेल्या रोजगार व उद्योजकता मेळाव्यात 595 उमेदवारांची प्राथमिक निवड
ठळक मुद्दे रोजगार व उद्योजकता मेळाव्यात 595 उमेदवारांची प्राथमिक निवड23नामांकित उद्योजक कंपन्यानी नोंदविला सहभाग 749 जागांसाठी 835 उमेदवारांच्या मुलाखती