नाशिक - लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात शांततेने मतदान सुरू असून पहिल्या दोन तासात अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. दोन तासांमध्ये जिल्ह्यातील 6.74% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
जिल्ह्यातील मालेगाव मध्य या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक नऊ टक्के तर कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये 3.05% असे सर्वात कमी मतदान नोंदवले गेले आहे. नाशिक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे तसेच अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, दिंडोरी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीही मतदान केले आहे. जिल्ह्यातील एक दोन ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत.