नामदेव भोर। लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सर्व शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षण अभियान यांचे एकत्रीकरण करून देशातील सर्व शाळांसाठी समग्र शिक्षण अभियान सुरू करण्यात आले असून, या समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील तीन हजार ३५८ शाळांना २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी सुमारे ७ कोटी ८३ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.या योजनेच्या माध्यमातून पटसंख्येच्या प्रमाणात अनुदान वितरित करण्यात आल्याने ३० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांना फटका बसला असला तरी अधिक पटसंख्येच्या शाळांना मात्र समग्र शिक्षाअंतर्गत अधिक अनुदान प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारने सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान यांचे एकत्रीकरण करून अस्तित्वात आणलेल्या समग्र शिक्षण अभियानांतर्गत शाळांवरील खर्च, अनुदानाचे वितरण यावर्षी पटसंख्येनुसार करण्यात आले आहे. यात तीसपेक्षा कमी पट असलेल्या राज्यातील शाळांना अवघे पाच हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.गेल्या वर्षी शंभरपेक्षा कमी पटाच्या शाळांसाठी साधारण दहा हजार रुपये अनुदान मिळत होते. आता शंभरपेक्षा कमी पटाच्या शाळांमध्येही आणखी वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार तीसपर्यंतच्या पटसंख्येच्या शाळांना पाच हजार रुपये, ३१ ते ६० पटसंख्येसाठी दहा हजार रुपये, ६१ ते १०० पटसंख्येसाठी २५ हजार रुपये, १०१ ते २५० पटसंख्येसाठी ५० हजार रुपये, २५१ ते १००० पटसंख्येसाठी ७५ हजार रुपये आणि एक हजारपेक्षा अधिक पटाच्या शाळांसाठी एक लाख रुपये संयुक्त शाळा अनुदान मिळणार आहे. यात साधारणपणे ६१ ते १०० आणि त्याहून अधिक पटसंख्या असलेल्या शाळांना वाढीव अनुदान मिळणार असून, जिल्हास्तरावरून एकूण ७ कोटी ८३ लाख ४० हजार रुपयांच्या अनुदानाचे वाटप नोव्हेंबरअखेपर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे अनुदान मिळालेल्या शाळांना त्याचा फायदा होणार आहे.तालुकानिहाय अनुदानाचे वाटपतालुका अनुदानाची रक्कम (रुपयांमध्ये)४ बागलाण ६१ लाख ८५ हजार४ चांदवड ४४ लाख २५ हजार४ देवळा २६ लाख १५ हजार४ दिंडोरी ६६ लाख ९० हजार४ इगतपुरी ५९ लाख १० हजार४ कळवण ४१ लाख४ मालेगाव ८३ लाख ४५ हजारतालुका अनुदानाची रक्कम (रुपयांमध्ये)४ नांदगाव ५२ लाख २० हजार४ नाशिक ३८ लाख १५ हजार४ निफाड ७२ लाख २५ हजार४ पेठ ३७ लाख ०५ हजार४ सिन्नर ५३ लाख ८५ हजार४ सुरगाणा ४९ लाख ७५ हजार४ त्र्यंबक ४३ लाख २० हजार४ येवला ५४ लाख २५ हजार
समग्र शिक्षाअंतर्गत ७ कोटी ८३ लाख अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:28 PM
सर्व शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षण अभियान यांचे एकत्रीकरण करून देशातील सर्व शाळांसाठी समग्र शिक्षण अभियान सुरू करण्यात आले असून, या समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील तीन हजार ३५८ शाळांना २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी सुमारे ७ कोटी ८३ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे३३५८ शाळांचा समावेश : ६० पेक्षा अधिक पटसंख्येच्या शाळांचा फायदा