नांदगाव : तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील एकूण ३५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी येत्या ६ आॅगस्टला तर ८ आॅगस्टला ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न होत आहे तर उर्विरत २४ ग्रामपंचायती साठी सरपंच निवडीसाठी १३ व १६ आॅगस्टला निवडणूक होतील.गेल्या एप्रिल मिहन्यात ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या मात्र ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झाल्यानंतरमावळत्या ग्रामपंचायतीची मुदत संपली नसल्याने देखील विजयी झालेल्या नविनर्वाचित सदस्यांना कारभार बघावयास मिळाल नव्हता आता हा मार्ग तीन महिन्यांच्या प्रतीक्षे नंतर मोकळा झाला आहे.६ आॅगस्टला ज्या ठिकाणी सरपंच निवडीचा कार्यक्र म घोषित झाला तेथी ग्रामपंचायतीचे नाव तेथील निवडणूक अधिकारी व कंसात आरक्षन - आमोदे (ओबीसी) पी एस बुरकुल, अनकवाडे (अनुसूचित जाती )श्रीमती आहिर , भालूर (सर्वसाधारण) अभिजित इनामदार, चिंचिवहीर (ओबीसी स्त्री ) के एम बागुल, जळगाव बुद्रक (ओबीसी स्त्री)ए बी खैरनार , जळगाव खुर्द (अनुसूचित स्त्री), सी एस सोनावणे, क-ही (सर्वसाधारण स्त्री) श्री चव्हाण, माळेगाव कर्यात (ओबीसी स्त्री) डी ए कस्तुरे, मांडवड,(अनुसूचितस्त्री) अशोक शिलावट, मोरझर (ओबीसी) बाबासाहेब खेडकर, रणखेडे (अनुसूचित जमाती स्त्री)पी आर बच्छाव , रोहिले बुद्रक (अनुसूचित जाती स्त्री) एस आर ढोके, सटाणे (सर्वसाधारण) कैलास चौधरी, सावरगाव (अनुसूचित जमाती स्त्री), तांदूळवाडी (सर्वसाधारण स्त्री) अशोक उशिरे, वडाळी खुर्द (ओबीसी स्त्री) पी एस शेजवळ आठ आॅगस्ट - बाभुळवाडी (अनुसुस्चीत जमाती स्त्री) आशिष आनंद, भौरी(ओबीसी ) एस डी महाले , बोलठाण ( ओबीसी ) ए वाय निकम, चांदोरा (सर्वसाधारण स्त्री) एन टी मोराणकर , गंगाधरी (ओबीसी स्त्री ) मदन हिरे, जवळकी (सर्वसाधारण) डी एन नाईकवाडे, कुसुमतेल (अनुसूचित जमातीस्त्री) डी ए कस्तुरे, न्यायडोंगरी(ओबीसी) बाबासाहेब खेडकर, परधाडी (अनुसुस्चीत जमाती) डी जी गायके, पिंप्री-हवेली(ओबीसी स्त्री) एस डी मानकर, पिंप्राळे (सर्वसाधारण स्त्री) विकास बैसाणे, पोखरी(अनुसुस्चीत जमाती) ए इ आहिरे, साकोरा (सर्वसाधारण स्त्री) कैलास चौधरी, वंजारवाडी (सर्वसाधारण) अशोक शिलावट , वाखारी(सर्वसाधारण) बी बी देशमुख या दोन टप्प्यानंतर उर्विरत दोन टप्प्यात इतर गरम पंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुका संपन्न होत आहे. (वार्ताहर)विंचूरच्या सरपंचपदाचा शुक्र वारी फैसलाविंचूर : येथील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंचपदाचा फैसला येत्या शुक्र वारी होणार आहे. दि. ७ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता येथील ग्रामपंचायत हॉलमध्ये नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.नव्या सदस्यांना पदाधिकारी निवडीचे अजेंडे पाठविण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी रंगलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांनी बाजी मारली असली तरी सरपंचपद स्त्री राखीव निघाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. सरपंचपद सर्वसाधारण स्त्री राखीव असल्याने इच्छुक उमेदवारांच्या पतिराजांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात असून, काही सदस्य सहलीसाठी रवाना झाले आहेत. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून आर.एस. खंदारे काम पाहणार आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.बी.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बदोबस्त ठेवण्यात येणार आहे.(वार्ताहर)
३५ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची ६ ला निवड
By admin | Published: August 04, 2015 11:02 PM