नाशिक : नाशिक सायकलिस्टसचा महत्त्वाचा उपक्रम असलेला नाशिक रँडोनर्स मायलर्स म्हणजेच एनआरएम या उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वातील चौथी फेरी उत्साहात पार पडली. एकूण ४० आणि १२० किमीची ही स्वीट समर राइडमध्ये एकूण ६० सायकलिस्टसने सहभाग नोंदवला. नाशिक रँडोनर्स मायलर्स या मॅरेथॉन रनच्या धर्तीवर सुरू झालेल्या बीआरएम म्हणजेच ब्रेव्हेट रँडोनर्स मायलर्स या लांब अंतराच्या व कमी वेगाच्या सायकलिंगसाठीचा तयारी करण्यासाठी बनविण्यात आलेला कार्यक्रम आहे. चौथ्या फेरीची सुरुवात गंगापूर नाका येथून (फायरफॉक्स सायकल्स) आडगाव नाका-भरवीर फाटा- नाशिक (पिंप्रीकर हॉस्पिटल्स) या मार्गावर पार पडली. त्यापैकी ३५ सायकलिस्टसने ही राइड वेळेत पूर्ण केली. ८० आणि १२० किमीच्या टप्प्यात होणारी एनआरएम राइड आता ४० किमीच्या टप्प्यातही आयोजित करण्यात येत असून, यावेळी तब्बल २५ सायकलिस्टसने सहभाग घेतला. बीआरएमसाठी सहभागी होणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, बीआरएम राईड्स आयोजित करणारे आणि रॅम फिनिशर डॉ. महेंद्र महाजन, विजय काळे यांच्यासह ६० सायकालिस्ट्स तसेच अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांनी एनआरएम २.४ या राइडमध्ये सहभाग नोंदवला. नाशिक सायकलिस्टच्या एनआरएम उपक्रमाची जबाबदारी नीता नारंग, प्रवीणकुमार खाबिया यांनी पार पाडली.
सायकलिंगच्या राइडमध्ये ६० सायकलिस्ट्चा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:23 AM
नाशिक : नाशिक सायकलिस्टसचा महत्त्वाचा उपक्रम असलेला नाशिक रँडोनर्स मायलर्स म्हणजेच एनआरएम या उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वातील चौथी फेरी उत्साहात पार पडली.
ठळक मुद्देनाशिक रँडोनर्स मायलर्स या मॅरेथॉन रनच्या धर्तीवर सुरूएनआरएम २.४ या राइडमध्ये सहभाग नोंदवला