सिन्नर : तालुक्यातील पिंपळे शिवारात म्हाळुंगी नदीवर ७० मीटर लांब कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयाचे काम प्रगतीपथावर आहे.म्हाळुंगी खोºयात दरवर्षी समाधानकारक पाऊस होत असतो. पुरेशा पावसांतर म्हाळुंगी नदीतून पाणी वाहून जाते त्यामुळे पावसाळा संपताच पिंपळे व परिसरातील नदीपात्रातील पाणी आटू लागते. परिणामी विहिरींची पातळी घटते आणि परिसराला टंचाईचा सामना करावा लागतो. यापार्श्वभूमीवर पिंपळे शिवारात बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी लावून धरली होती. आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षशीतल सांगळे यांनी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागांतर्गत कोल्हापूर टाईप बंधाºयाचा प्रस्ताव सादर करून त्यास मंजुरी मिळवण्यात आली.बंधाºयाचे काम प्रगतीपथावर असून पाऊस लांबल्यास येत्या दहा-बारा दिवसांत काम पूर्ण होण्याची शक्यता लपाचे अभियंता एस. एम. थोरात यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान बंधाºयाची पाहणी केली त्याप्रसंगीउदय सांगळे यांच्यासमवेत सरपंच डॉ. राजेंद्र बिन्नर, संजय पानसरे, पोपट रूपवते, सुभाष घुगे, रामदास रूपवते, आर. टी. शिंदे आदी उपस्थित होते.कोटा बंधाºयासाठी ४९ लाख रूपये मंजूर आहेत. ७० मीटर लांब व २१ फुट उंच या बंधाºयात ५८ टिसीएम (२.५ द. ल. घ. फू.) पाणीसाठा होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेकडो हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी फायदा होईल. जवळपास ६० टक्के काम पूर्ण झाले असून पाऊस लांबल्यास १०-१५ दिवसांत काम पूर्ण होईल.
पिंपळेत कोटा बंधाऱ्याचे ६० टक्के काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 6:13 PM