वावी : सिन्नर तालुक्यात जनावरांमध्ये पीपीआर नावाचा आजार बळावत असून, त्यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मेंढ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मेंढपाळ व्यावसायिकांनी जनावरांना लसीकरण करून घ्यावे. यासाठी प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात लस उपलब्ध असल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांनी केले.पाण्याची बिकट परिस्थिती असल्याने हे कुटुंब आपली उपजीविका करण्यासाठी जनावारांसहित देवपूर परिसरात भटकंती करीत आहे. अज्ञात रोगाची लागण झाल्याने ३ दिवसांत ४५ मेंढ्या दगावल्या आहेत. मेंढ्या मृत्युमुखी पडत असल्याने मेंढपाळाने खासगी डॉक्टरकडून उपचार करून घेत लसीकरण केले; मात्र आजाराचेप्रमाण जास्त असल्याने पुन्हा १५ मेंढ्या दगावल्या. आतापर्यंत एका आठवड्यात जवळपास ६० मेंढ्या मृत्यमुुखी पडल्या आहे. पशुधन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. प्रदीप झोड, तालुका पशुधन अधिकारी डॉ. मिलिंद भणगे, डॉ. अरविंद पवार, डॉ. शेळके आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मेंढ्यांची तपासणी केल्यानंतर मेंढ्यांना पीपीआर नावाच्या आजाराची लक्षणे दिसून आली. या आजारामुळे मेंढ्यामरण्याचे प्रमाण वाढत असल्याचे डॉ. झोड यांनी सांगितले. पशुधन विभागाच्या टीमने मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन केले. गोराणे कुटुंबास शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
आठवडाभरात अज्ञात रोगाने ६० मेंढ्या दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 4:56 PM
वावी : सिन्नर तालुक्यात जनावरांमध्ये पीपीआर नावाचा आजार बळावत असून, त्यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मेंढ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मेंढपाळ व्यावसायिकांनी जनावरांना लसीकरण करून घ्यावे. यासाठी प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात लस उपलब्ध असल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांनी केले.
ठळक मुद्देदेवपूर येथे गोराणे कुटुंबाच्या आठवडाभरात ६० मेंढ्या अज्ञात रोगाने दगावल्याच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी भेट देऊन मेंढ्यांची तपासणी करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. देवपूर शिवारात वावी येथील रहिवासी भाऊसाहेब गोराणे व नानासाहेब गोराणे मेंढीपालनाचा पारंपरिक