सिन्नर : तालुक्यातील माळेगाव व मुसळगाव औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळगावी परतण्यासाठी प्रशासनाने मागणी केल्याप्रमाणे विशेष रेल्वेची व्यवस्था झाल्याने ६२७ परप्रांतीय कामगारांची घरवापसी झाली. सिन्नर आगारातील २३ बसेसमधून या कामगारांना नाशिकरोड रेल्वेस्थानकापर्यंत सोडण्यात आले. त्यानंतर विशेष रेल्वे मध्य प्रदेशकडे रवाना झाली.बुधवारी (दि.१३) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एल अँड टी फाटा, बायपासजवळ, माळेगाव येथून या २३ बसेस सोडण्यात आल्या. यावेळी जि.प.सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी बसचालकांना मास्कचे वाटप केले. याप्रसंगी तहसीलदार राहुल कोताडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, सिन्नरचे आगारप्रमुख भूषण सूर्यवंशी, वाहतूक नियंत्रक प्रमोद घोलप, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, मंडळ अधिकारी संजय गाडे, माणिक गाडे आदींसह कामगार तलाठी उपस्थित होते.गावी जाण्याची इच्छा असणाºया परप्रांतीय औद्योगिक कामगारांची तसेच बांधकाम, स्वीट मार्केट, फर्निचर आदी विविध लघुउद्योगांत कार्यरत असणाºया परप्रांतीय कामगारांची आॅनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले. त्यासाठी पथकांची नियुक्तीही करण्यात आली होती. या माध्यमातून सुमारे दहा हजाराहून अधिक परप्रांतीय कामगारांचीदेखील नोंदणी करण्यात आली असून, प्रशासकीय पातळीवर त्यांच्या प्रवासाची तयारी केली जात असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली. मध्य प्रदेशात जाण्यासाठी सुमारे १ हजार कामगारांनी नोंदणी केली केली होती. त्यांच्याकरता विशेष रेल्वेचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.-----------------------------------------------तलाठी बनले कंडक्टरपरप्रांतीय कामगारांच्या घरवापसीसाठी तहसीलदार राहुुल कोताडे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी पथकात चोख कामगिरी पार पाडणारे तलाठी यांना परप्रांतीय कामगारांना नाशिकरोड स्थानकापर्यंत पोहोचविण्यासाठी पाठविण्यात आलेल्या बसेसमध्ये कंडक्टर म्हणून पाठविण्यात आले. माळेगाव फाटा येथून निघालेल्या बसेस नाशिकरोड येथे जात असताना रस्त्यात मध्य प्रदेशात जाणारे परप्रांतीय पायी चालताना आढळून आल्यास त्यांनाही बसमध्ये घेण्याच्या सूचना तहसीलदार कोताडे यांनी देत जास्तीचे टोकन या कंडक्टररुपी तलाठ्यांकडे देण्यात आले होते. विशेष म्हणजे बस सुटण्यापुर्वी तहसीलदार यांनी पुढे जात चिंचोली फाटा येथे प्रवाशांची तपासणी केली.
६२७ परप्रांतीय कामगारांची रेल्वेने घरवापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 8:42 PM