नाशिक : जिल्ह्यात गत दोन दिवसात कोरोना रुग्णसंख्येत ५३३ ची वाढ झाली असून, ६३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३ तर नाशिक शहरातील ३ याप्रमाणे झालेल्या ६ मृत्यूंमुळे एकूण बळींची संख्या १९४५ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८ हजार ९१२ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ४ हजार ५७१ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर २३९६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.०१ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९६.८४, नाशिक ग्रामीण ९४.७२, मालेगाव शहरात ९२.६७, तर जिल्हाबाह्य ९३.४१ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २३९६ बाधित रुग्णांमध्ये १२९२ रुग्ण नाशिक शहरात, ९२७ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १५९ रुग्ण मालेगावमध्ये, तर १८ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या चार लाख २२ हजार ४७५ असून, त्यातील ३ लाख १२ हजार ८२४ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख ८ हजार ९१२ रुग्ण बाधित आढळून आले असून, ७३९ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.