इंदिरानगर : महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या सातव्या दिवशी नाशिक पूर्व विभागात ६४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात नगरसेवक सतीश सोनवणे, नीलिमा आमले, मेघा साळवे, सुफीयान जीन, समीना मेमन, अर्चना थोरात यांच्यासह काही माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. पूर्व विभागात गुरुवारी प्रभाग १३ मधून राष्ट्रवादीकडून गजानन शेलार आणि विद्यमान नगरसेवक संजय चव्हाण यांची कन्या स्नेहल चव्हाण, प्रभाग ३० मधून भाजपाचे नगरसेवक सतीश सोनवणे, अपक्ष नगरसेवक संजय चव्हाण, प्रभाग १६ मधून नगरसेवक मेघा साळवे, प्रभाग २३ मधून राष्ट्रवादीच्या नगरसेवक नीलिमा आमले, प्रभाग १५ मधून नगरसेवक अर्चना थोरात, प्रभाग १४ मधून कॉँग्रेसच्या नगरसेवक समीना मेमन, प्रभाग १४ मधून राष्ट्रवादीचे नगरसेवक सुफीयान जीन, प्रभाग १३ मधून भाजपाकडून माधुरी जाधव, मनसेकडून माधुरी शिरसाठ, भाजपाकडून रतन काळे, स्नेहल मुळे, वैशाली जाधव, गणेश मोरे, प्रभाग १४ मधून भारती काळे, अलका गांगुर्डे, हिना इनामदार, नजिरा अत्तार, सतीश कहार, निजाम शेख, ताहीर कोकणी, अस्लम पठाण, मयुद्दीन शेख, विद्या चव्हाण, रामसिंग बावरी, प्रभाग १५ मधून सीमा पवार, प्रिया नागवंशी, सुमन भालेराव, सोनाली भालेराव, अमर गांगुर्डे, प्रभाग १६ मधून कोमल साळवे, पूनम हिरे, मनीषा भालेराव, प्रभाग २३ मधून सलीमाबी पठाण, ऋषिकेश वर्मा, प्रभाग ३० मधून चंद्रकांत अल्हाट, उषा साळवे, नीलेश चव्हाण, सुप्रिया खोडे, शकुंतला खोडे, शालिनी गायकर, प्रवीण दाते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने उमेदवारांची झुंबड उडणार आहे. (वार्ताहर)
पूर्व विभागात ६४ अर्ज
By admin | Published: February 03, 2017 1:24 AM