शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

६५ टक्के पीएफ खाते ‘लिंक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:28 AM

भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून दिवसेंदिवस पारदर्शक कारभाराकडे वाटचाल सुरू आहे. ‘उमंग’ नावाचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून, या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून खातेदारांना घरबसल्या आपले व्यवहार करता येतील.

सातपूर : भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून दिवसेंदिवस पारदर्शक कारभाराकडे वाटचाल सुरू आहे. ‘उमंग’ नावाचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून, या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून खातेदारांना घरबसल्या आपले व्यवहार करता येतील. आतापर्यंत ६५ टक्के खातेदारांनी आपले खाते लिंक केले असून, उर्वरित पीएफ खातेदारांनी ३१ डिसेंबरच्या आत आॅनलाइन केवायसी करून घ्यावे, असे आवाहन भविष्य निर्वाह निधी आयुक्त एम.एम. अशरफ यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.  पीएफ आयुक्त अशरफ यांनी सांगितले की, पूर्वी पी.एफ. खातेदारांना आपल्या खात्यावरील रक्कम पाहण्यासाठी अथवा निधी काढण्यासाठी वारंवार भविष्य निर्वाह निधी कार्यालयात यावे लागत होते आणि तासन्तास ताटकळत थांबावे लागत होते. गर्दीमुळे कर्मचाऱ्यांना खातेदारांना सेवा देण्यास अडचण निर्माण होत होती. त्यात नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यातील खातेदारांची परवड होत होती.आता ‘उमंग’ नावाचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आलेले आहे. या अ‍ॅप्लिकेशनमुळे खातेदारांना आपल्या मोबाइलवर खात्यातील शिल्लक रक्कम, एकूण जमा रक्कम नियमित पाहता येईल. शिवाय खात्यातून काही रक्कम काढायची सोयदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता राहणार नाही. या अ‍ॅप्लिकेशनमुळे खातेदारांची गैरसोय होणार नाही, असा दावा भविष्य निर्वाह निधी आयुक्त एम. एम. अशरफ यांनी केला आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारीProvident Fundभविष्य निर्वाह निधीNashikनाशिक