नाशिक : जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील मुलींच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्ह्णातील सुमारे ६ हजार ६६६ मुलींना ज्युदो-कराटेचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. ग्रामीण, आदिवासी भागातील मुलींना संरक्षण मिळावे म्हणून आखण्यात आलेल्या उपक्रमासाठी २६ तालुक्यांतून लाभार्थ्यांचे लक्ष निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या इयत्ता चौथी ते दहापर्यंतच्या विद्यार्थिनी तसेच महाविद्यालयीन विद्याार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत महिलांना व मुलींना शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व त्यांच्या शारीरिक विकासासाठी प्रशिक्षण योजना प्रस्तावित केलेलली आहे. या योजनेंतर्गत महिला व मुलींवर होणारे अन्याय, त्यांचे होणारे लैंगिक शोषण अशा घटनांना त्यांनी सक्षमपणे तोंड देता यावे यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता चौथी ते दहावीपर्यंतच्या मुलींना, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनींनाही स्वसरंक्षणासाठी ज्युडो-कराटे शिकविले जाणार आहे. नाशिक जिल्ह्णातील सुमारे ६,६६६ मुली व महिलांना मोफत ज्युडो-कराटे व योगाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अर्पणा खोसकर यांनी सांगितले. सदर योजनेचा लाभ नाशिक जिल्ह्णातील ग्रामीण, आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींना, महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षण हे ब्लॅक बेल्टधारक प्रशिक्षकांकडून शालेय कामकाकाजाच्या वेळेपूर्वी किंवा वेळेनंतर देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणांसाठी संबंधित तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीचे सभापती खोसकर यांनी सांगितले. या योजनेसाठी पेठ तालुक्यातील २५६, हरसूलमधील २५६, सुरगाणा-२५६, सुरगाणा-(२)२५६, इगतपुरी-२६०, दिंडोरी-२५६, दिंडोरी (२) २५६, नाशिक-२५७, त्र्यंबकेश्वर-२५६, देवळा- २५६, बागलाण-२५६, बागलाण (२) २५६, कळवण-२५६, कळवण(२) २५६, सिन्नर-२५६, सिन्नर-२५६, सिन्नर (२) २५६, निफाड-२५७, मनमाड-२५६, पिंपळगाव (ब)-२५६, नांदगाव-२५६, येवला-२५६,येवला (२)-२५६, चांदवड-२५६, चांदवड (२) २५६, मालेगाव-२६०, रावळगाव-२५६ याप्रकारे तालुकानिहाय लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. समाजात मुलींच्या संदर्भात घडलेल्या अप्रिय घटनांनंतर अनेक सामाजिक संस्था आणि संघटना तसेच पोलिसांकडून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे उपक्रम हाती घेण्यात आले होते. अनेक शाळांमध्ये पोलिसांनी प्रात्यक्षिकेही करून दाखविली. काही संस्थांनी मोफत प्रशिक्षणाचीही घोषणा केली होती. विशेष म्हणजे हे सारे प्रकार शहरापुरतेच मर्यादित होते.परंतु काही दिवसांतच मुलींच्या सक्षमीकरणाचा उमाळा कमी झाला आणि त्याबद्दल कुठेच काहीही घडले नाही. त्यामुळे जिल्हा परिषद तसेच बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून होणाºया उपक्रमामुळे जिल्ह्णातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील मुलींना न्याय मिळणार आहे.
मुलींना मिळणार स्वसंरक्षणाचे मोफत धडे ६६६६ लाभार्थी : सभापती अपर्णा खोसकर यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 1:29 AM
नाशिक : जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील मुलींच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्ह्णातील सुमारे ६ हजार ६६६ मुलींना ज्युदो-कराटेचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
ठळक मुद्देमहाविद्यालयीन विद्याार्थ्यांनाही या योजनेचा लाभ स्वसरंक्षणासाठी ज्युडो-कराटे शिकविले जाणार