शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

नाशिकमध्ये ६७ हजार शेतकऱ्यांना बसला अवकाळी पावसाचा फटका

By अझहर शेख | Published: April 19, 2023 1:01 PM

३० हजार हेक्टर कांदापिकाचा चिखल

अझहर शेख, नाशिक: जिल्ह्याला ७ ते १७ एप्रिल या कालावधीत वादळी गडगडाटी अवकाळी पाऊस व गारपिटीने जोरदार तडाखा दिला. यामुळे पंधरा तालुक्यांमधील ७८० गावे बाधित झाली आहेत. सुमारे ६६ हजार ९२३ शेतकऱ्यांच्या शेतपिकांची मोठी हानी झाली आहे. मागील महिनाभरापासून अवकाळी पावसाचा सामना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मागील दोन आठवड्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतपिकाचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. वादळी पावसासह गारपीटही झाल्यामुळे नुकसानीमध्ये अधिकच भर पडली. एप्रिल महिन्यात कडक उन्हाळा असतो. मात्र, या वर्षी अवकाळी पावसाने दोन आठवडे हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

मागील ४५ दिवसांत जिल्ह्यात ४१ मिमी इतका अवकाळी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये पाऊस झाला. त्यामुळे ३७ हजार ९८१ हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. यामध्ये ३० हजार २५६ हेक्टर क्षेत्रावरील कांदापिकाचा अक्षरक्ष: चिखल झाला. याशिवाय २ हजार ६४५ हेक्टरवरील द्राक्षबागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. १ हजार ७१५ हेक्टरवरील पालेभाज्या, फळभाज्या पिकाचेही नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान सटाणा-बागलाण तालुक्यात झाले असून, तेथील २३ हजार ४२२ हेक्टरवरील शेतपिकांची अवकाळी पावसामुळे नासाडी झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. याच तालुक्यातील १५२ गावांमधील ३४ हजार ६४५ शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे नुकसानीचा सामना करावा लागला आहे.

तालुकानिहाय शेतीचे नुकसान (हेक्टरी)

तालुका -- गावे---- बाधित शेतकरी --------- क्षेत्र

  • सटाणा- १५२---- ३४,६४५ ------------- २३,४२२
  • मालेगाव - ४४------- १,४६६ ------------- ००,९१५
  • नांदगाव - ५७---------१२,७५२ ------------- ५,४४४
  • कळवण- ४३ ---------१,६३४ ----------------०,७२४
  • देवळा - ०७-----------६३४ ---------------- ०३५५
  • दिंडोरी- ११३------- ३,०६५ ---------------- १,८६६
  • सुरगाणा- १०६-----------२,१४८ -----------------०,५६८
  • नाशिक- ५३------------- १,१७५ ----------------०,५९७
  • त्र्यंबकेश्वर- १३ ------------- ७७ -----------------०,०१८
  • पेठ---- २३-------------- ३५६ -----------------०२१४
  • इगतपुरी - २३---------- १,९६९------ -------०,५४४
  • निफाड- ८०------------- ३,०२६ --------------- १,५४६
  • सिन्नर- २६---------------६३७ ------------------०,३७७
  • चांदवड- २५------------ ३,१७९ ---------------- १,२९४
  • येवला - १५-------------- १६० ------------------०,०९२
  • एकूण - ७८०             ६६,९२३ -------------- ३७,९८१

शेतपिकांचे नुकसान (हेक्टरी)

  • कांदा - ३०,२५६
  • द्राक्षे - २,६४५
  • भाजीपाला - १,७१५
  • डाळिंब - ९९७
  • गहू - ७२३
  • आंबा - ५००
  • मका - ३८०
  • टोमॅटो - ३२६
  • बाजरी - २२६
टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी