नाशिक : जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी देण्यात येणाºया अनुदानापोटी सन २०१९-२० या वर्षात सहा कोटी ८९ लाख ९७ हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे. यात जिल्ह्यातील २०७ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान देण्यात आले असून, त्यासाठी दोन कोटी ५१ लाख ६० हजार रुपयांचा निधी खर्च केला आहे.अल्पभूधारक शेतकºयांना शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर, ट्रेलर, मळणी यंत्र, रिपर, पेरणी यंत्र, मिनी राइस मिल यांसह विविध शेती औजारांसाठी कृषी विभागाकडून यांत्रिकीकरण अभियान योजनांतर्गत अनुदान देण्यात येते. ट्रॅक्टरसाठी शेतकºयाला १ लाख २५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. सन २०१९-२० या वर्षात ३१ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील २०७ शेतकºयांना ट्रॅक्टरसाठी अनुदान देण्यात आले. त्यात अनुसूचित जातीच्या २७, अनुसूचित जमातीच्या ७३ आणि सर्वसाधारण गटातील १०७ शेतकºयांचा समावेश आहे. शेती औजारांसाठी अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकºयांना ५० टक्के, सर्वसाधारण गटासाठी ४० टक्केअनुदान दिले जाते.कृषी यांत्रिकीकरण उपअभियान घटक ३ योजनेअंतर्गत जिल्ह्णासाठी पाच कोटी ५८ लाख ४५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी आतापर्यंत ४ कोटी ६४ लाख ४ हजार रुपयांचा निधी खर्च झाला असून, त्यातून ६०५ शेतकºयांना लाभ देण्यात आला आहे. सर्वाधिक संख्या मालेगाव उपविभागाची असून, येथे १६९ शेतकºयांना लाभ मिळाला आहे.राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ५९ लाख ५७ हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यातील ५० लाख ९३ हजारांचा निधी खर्च झाला असून, एकूण ९६ शेतकºयांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेतही मालेगाव विभाग पुढे असून, ३६ शेतकºयांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. कळवण उपविभागात २६ शेतकºयांना १२ लाख ८ हजारांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.राष्टÑीय कृषी विकास योजनेअंतर्गत यांत्रिकीकरणासाठी एकूण २ कोटी ८७ लाख ३९ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी एक कोटी ७५ हजारांचा निधी खर्च झाला आहे. या योजनेचे १ कोटी १२ लाख ३९ हजार रुपये अद्याप शिल्लक आहेत. या योजनेचा ३४६ शेतकºयांना लाभ देण्यात आला आहे. कळवण उपविभागात ४८ लाख ३७ हजारांचा निधी खर्च झाला आहे.
शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी सात कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:36 AM