मनमाड - मालेगाव-सटाणा रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपे रिक्षाला अज्ञात वाहनाची धडक बसल्यानं ही दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सटाणा- मालेगाव रोडवर शेमळी शिवारात गुरुवारी (28 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.
मालेगावकडून सटाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अपे रिक्षाला शेमळी शिवारात अज्ञात ट्रकने धडक दिल्याने रिक्षातून प्रवास करणा-या सातही जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपे रिक्षाला धडक देऊन पसार झालेल्या ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही.
त्यांचे मृतदेह सटाणाच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. मात्र अपघात स्थळी सापडलेली खेळणी व अन्य साहित्यावरुन सर्वजण व्यावसायिक असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या सटाण्यात सुरू असलेल्या यशवंत महाराज यात्रेत खेळणी विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी हे व्यावसायिक येत असल्याचेही माहिती समोर आली आहे.
मृतांची नावं
रिक्षा चालक संजय पंधाडे (वय 40 वर्ष) अयोध्यानगर ,मालेगाव
व्यावसायिक अलीम शेख तायर (वय 34 वर्ष) मण्यार गल्ली,चोपडा
अशोक शंकर देवरे (वय 55 वर्ष) पारोळा रोड, अमळनेर
राजेशकुमार शंकरदास गुप्ता (वय 28 वर्ष)
कैलास प्रसाद गुप्ता (वय 42 वर्ष)
मोहम्मद लखन जल्लू (वय 45 वर्ष)
रहेमतुल्लाभाई पानवाला (वय 43 वर्ष)