नाशिक : शहर व परिसरात सातत्याने कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढत असल्याने आता प्रशासनदेखील चिंतेत सापडले आहे. रविवारी (दि.१९) संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत जिल्हा शासकिय रूग्णालयाच्या निवासी वैद्यकिय अधिकाऱ्यांमार्फत प्राप्त झालेल्या अहवालानुसार दिवसभरात महापालिका क्षेत्रात नवे ३११ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. यामुळे आता शहराचा आकडा थेट ५ हजार ७२२ इतका झाला आहे. तसेच ग्रामिण भागात ७८, मालेगावात ८ आणि जिल्हाबाहेरील १ असे एकूण ३९८ रुग्णांची नव्याने भर पडली. दिवसभरात शहरात ३ कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ग्रामिण भागातसुध्दा ४ रूग्ण दगावल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा आता ३९० इतका गंभीर झाला आहे. आज एकूण ३१२ रूग्णांनी जिल्ह्यात कोरोनावर मात केली. जिल्ह्यात अद्याप ६ हजार ३५१ रूग्ण बरे झाले आहेत. सध्या २ हजार ६७८ रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण ७९९ नमुने चाचणी अहवाल अद्याप प्रलंबित असून यामध्ये ग्रामीणमधील ४८४ नमुन्यांना समावेश आहे. तसेच २३० शहरातील अहवाल प्रलंबित आहे. जिल्ह्याचा एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ९ हजार ४१९ इतका झाला आहे.नाशिक शहरात मृत्यू झालेल्यांमध्ये वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टी (घरकुल प्रकल्प) येथील ६० वर्षीय वृध्द, वडाळारोडवरील भारतनगर येथील ४३ वर्षीय इसम, दिंडोरीरोडवरील ५५ वर्षीय इसमाचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात एकूण २०५ कोरोनाबाधितांचा अद्याप मृत्यू झाला आहे. ग्रामिण भागात ८७ तर मालेगावात ८२ आणि जिल्हाबाहेरील १६ रूग्ण मृत्यूमुखी पडले आहेत.
७ मृत्यूमुखी : शहरात आज पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या तीनशेपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 8:04 PM
नाशिक : शहर व परिसरात सातत्याने कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढत असल्याने आता प्रशासनदेखील चिंतेत सापडले आहे. रविवारी (दि.१९) संध्याकाळी ...
ठळक मुद्देशहराचा आकडा ५ हजार ७२२ इतका झाला महापालिका क्षेत्रात एकूण २०५ कोरोनाबाधितांचा मृत्यू आज एकूण ३१२ रूग्णांनी जिल्ह्यात कोरोनावर मात केली