दिंडोरी : द्राक्षमालाचा भाव ठरवून खरेदी केलेल्या मालाचे पैसे न देता सुमारे ७० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध आशेवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिंडोरी तालुक्यातील रामशेज व आशेवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी पोपट कारभारी शेळके यांनी दिंडोरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, द्राक्ष निर्यातदार व अन्य दोन व्यापाऱ्यांनी पोपट शेळके व अन्य शेतकऱ्यांच्या निर्यातक्षम द्राक्षांच्या बागेत जाऊन प्रत्यक्ष खरेदीचा भाव ठरवीला होता. तसेच त्यातील द्राक्ष माल खुडून नेला होता. (वार्ताहर)
शेतकऱ्यांची ७० लाखांची फसवणूक
By admin | Published: February 10, 2017 10:39 PM