नाशिक : मकर संक्रांतीपासून गायब झालेली थंडीची लाट मागील दोन ते तीन दिवसांपासून नाशिकमध्ये पुन्हा परतली आहे. नाशिकमध्ये हंगामातील नीचांकी ७.२ इतके किमान तपमान गुरुवारी (दि.२५) नोंदविले गेले. राज्यात सर्वाधिक कमी किमान तपमानाची नोंद नाशिकला झाली. तपमानात सातत्याने होणा-या घसरणीमुळे नागरिक गारठले आहेत.हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर व उत्तर राजस्थान भागात शीतलहर वाढल्यामुळे उत्तर महाराष्टÑ गारठून गेला आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीला हा गारवा आल्हाददायक असला तरी उर्वरित शहरांना हुडहुडी भरली आहे. राज्यातील सर्वाधिक थंडी मागील दोन दिवसांपासून नाशिकमध्ये असून नाशिक थंडीने गारठले आहे. हंगामात २७ डिसेंबर रोजी सर्वाधिक कमी ८.२ इतक्या किमान तपमानाची नोंद झाली होती; मात्र गुरुवारी पारा थेट ७.२ अंशांपर्यंत घसरल्याने ही नोंद हंगामातील सर्वाधिक नीचांकी ठरली. २०१६ साली नाशिकमध्ये सर्वाधिक कमी किमान तपमान ५.५ अंश इतके नोंदविले गेले होते.गेल्या वर्षी डिसेंबरच्या २७ तारखेला हंगामातील नीचांकी ८.२ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले होते. एकूणच डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात नाशिककर गारठले होते. नववर्ष उजाडल्यानंतर थंडीची तीव्रता कमी होण्यास सुरुवात झाली होती. बुधवारी (दि.२४) ८.८ अंशांपर्यंत तपमान घसरले. निफाड तालुका चांगलाच गारठला असून, गुरुवारी नीचांकी ४.८ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले. रविवारपासून किमान तपमान घसरण्यास सुरुवात झाली. पारा रविवारी व सोमवारी १०.८ अंशांवर होता. मंगळवारी पारा १२.६ अंशांपर्यंत वाढला; मात्र बुधवारी पारा थेट ८.८ अंंश आणि गुरुवारी ७.२ अंशांपर्यंत घसरला. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कमाल तपमानात अल्प वाढ झाली.
७.२ किमान तपमान : राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक थंडीची लाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 7:06 PM
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर व उत्तर राजस्थान भागात शीतलहर वाढल्यामुळे उत्तर महाराष्टÑ गारठून गेला आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीला हा गारवा आल्हाददायक असला तरी उर्वरित शहरांना हुडहुडी भरली आहे. राज्यातील सर्वाधिक थंडी मागील दोन दिवसांपासून नाशिकमध्ये असून नाशिक थंडीने गारठले आहे.
ठळक मुद्दे गुरुवारी पारा थेट ७.२ अंशांपर्यंत घसरल्याने ही नोंद हंगामातील सर्वाधिक नीचांकीनाशिककरांना पुन्हा हुडहुडी निफाड तालुका चांगलाच गारठला