शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

पुणेकर महिलेचा ७२ हजारांचा ‘राणीहार’ चोरट्यांनी नाशकात लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 17:10 IST

तपोवन चौफूलीवरील रस्ता ओलांडत असताना पल्सरसारख्या मोटारसायकलवरून दोघे अज्ञात चोरटे भरधाव आले व त्यांनी त्यांच्या गळ्यात असलेला साडेतीन तोळे वजनाचा सुमारे ७० हजार रूपये किंमतीचा ‘राणी हार’ ओरबाडून धूम ठोकली.

ठळक मुद्देचोरट्यांनी ७२ हजारांचा ऐवज लूटला शहरात वाढलेल्या जबरी चो-याही रोखण्याचे आव्हान

नाशिक : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून चोरट्यांकरिता हा हंगाम जणू पर्वणीच ठरत आहे. लग्नसोहळ्यासाठी बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये घरफोडी असो किंवा विवाहसोहळ्याच्या गर्दीचा फायदा घेत मंगलकार्यालये, लॉन्समध्ये चोरी करण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत. तपोवनात अशाच पध्दतीने दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी एका लॉन्सच्या परिसरात रस्ता ओलांडणा-या महिलेच्या गळ्यातील ‘राणीहार’ ओरबाडून पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे.तपोवन चौफूलीवरील एका लॉन्समध्ये विवाहसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी स्वाती विजय परमेश्वर (३३,रा. पुणे) या वाहनातून उतरल्या व रस्ता ओलांडत असताना पल्सरसारख्या मोटारसायकलवरून दोघे अज्ञात चोरटे भरधाव आले व त्यांनी त्यांच्या गळ्यात असलेला साडेतीन तोळे वजनाचा सुमारे ७० हजार रूपये किंमतीचा ‘राणी हार’ ओरबाडून धूम ठोकली. या हारवर २ हजाराचे एकग्रॅम सोन्याचे एक गंठणही बनविलेले होते. एकूणच चोरट्यांनी जबरी लूट करत ७२ हजारांचा ऐवज लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी अज्ञात सोनसाखळी चोरट्यांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरिक्षक सदाफुले करीत आहेत.काही दिवसांपुर्वीच गंगापूररोडवरील एका लॉन्समध्ये चक्क वधु कक्षात ठेवलेले सुमारे ५० ते ६० हजार रूपयांचे दागिणे अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याचे उघडकीस आले होते. तसेच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिडको परिसरात विवाहसाठी बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या घरांची कुलूपे तोडून हजारो ते लाखो रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती.ऐन निवडणूकीची धामधूम अन् लग्नसराईचा हंगाम एकाचवेळी आल्यामुळे पोलीस निवडणूक बंदोबस्तात अडकले असताना चोरट्यांसाठी मात्र लग्नसराई सुगीची ठरत असून ते नागरिकांच्या दागिण्यांवर डल्ला मारताना दिसून येत आहे. निवडणूक काळात कायदासुव्यवस्था टिकविण्यासोबत पोलिसांपुढे शहरात वाढलेल्या जबरी चो-याही रोखण्याचे आव्हान यामुळे उभे राहिले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyदरोडाCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला