नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव या अतिसंवेदनशील शहरात कोरोनाने दीड महिन्यापूर्वी थैमान घातले. मालेगावात खडा पहारा देणाऱ्या ग्रामीण पोलीस दलातसुद्धा कोरोनाने शिरकाव केला. पोलीस अधीक्षक मुख्यालयाचे जवळपास ४ अधिकारी व ९२ कर्मचारी असे ९६ पोलीस कोरोनाबाधित झाले होते. त्यापैकी ८९ कर्मचारी कोरोनामुक्त झाले आणि ७३ पोलिसांनी पुन्हा अंगावर ‘खाकी’ चढवून कर्तव्यावर हजेरीसुद्धा लावली आहे.कोरोनाचे संक्रमण मालेगावात नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून संपर्णत: ‘बॅकअप’ देत पोलिसांनी मालेगावमध्ये दिवसरात्र एक केला. या आपत्कालीन परिस्थितीत कोरोनासारख्या साथरोगाला नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य प्रशासनाला ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने दिलेली साथ महत्त्वाची ठरली. त्याशिवाय मालेगावमध्ये कोरोना रुग्णांचा वाढता आलेख कमी होणे अशक्यच होते. या काळात बंदोबस्ताचे कर्तव्य पार पाडताना कोरोनाची बाधा होऊन तीन ग्रामीण पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आणि एकूण ९६ पोलीस बाधित झाले; मात्र तरीदेखील ग्रामीण पोलीस दलाने आपले मनोबल ढासळू दिले नाही. कोरोनाबाधित झालेले चार पोलीस अधिकारी आणि ९४ कर्मचाऱ्यांनी उपचारादरम्यान कोरोनाशी कडवी झुंज दिली. त्यापैकी चार अधिकारी आणि ६९ कर्मचारी कोरोनामुक्त होऊन पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजरही झाले. तसेच एकूण ९६ कोरोनाबाधितांपैकी सध्या उपचारार्थ केवळ ४ पोलीस दाखल असून, ८९ पोलीस कर्मचारी ठणठणीत बरे होऊन घरी आले आहेत. त्यापैकी ७३ कर्मचाºयांनी पुन्हा वर्दी अंगावर चढविली आहे. दुर्दैवाने कोरोनाशी झुंज देताना तिघा कर्मचाºयांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ग्रामीण पोलीस दलाला तिघा कर्मचाºयांचे बलिदान द्यावे लागले असले तरी या ऐतिहासिक लढ्याची भविष्यात जेव्हा-जेव्हा चर्चा होईल, तेव्हा त्या शूरवीर कोरोनायोद्ध्यांच्या स्मृती नक्कीच जागविल्या जातील, असा विश्वासही सिंह यांनी व्यक्त केला.--------------------------मालेगावला यांनी बजावले कर्तव्यपोलीस दल - कोरोनामुक्तीचा आकडानाशिक ग्रामीण - ९६ पैकी ८९एसआरपीएफ (जालना) - ३९ पैकी ३९४एसआरपीएफ (औरंगाबाद)- १० पैकी १०४एसआरपीएफ (अमरावती)- १३ पैकी १३४रेल्वे पोलीस (मुंबई) - १७ पैकी १२
७३ कोरोनायोद्ध्यांनी पुन्हा चढविली ‘खाकी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:53 PM