नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि.२९) रात्री आठ वाजेपर्यंत ५७ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. एकूण रुग्णसंख्या आता १ हजातर ५८ इतकी झाली आहे. बुधवारी मालेगावमध्ये दिवसभरात २५ नवे रुग्ण आढळले तर नाशिक ग्रामीणमध्ये १९, शहरात १० आणि जिल्ह्याबाहेरील दोघांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून २५८ रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत.शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमध्ये एकाच दिवशी २५ व्यक्ती नव्याने पॉझिटिव्ह आढळून आल्या. तसेच सिन्नर तालुक्यात नव्याने ८, येवला तालुक्यात ६, बागलाणा तालुक्यात ४ तसेच अहमदनगर जिल्ह्यातील दोघांचा तर नंदुरबार जिल्ह्यातील एका व्यक्तीचा अहवालही पॉझटिव्ह आला आहे. तसेच शहरात नव्याने १० कोरोनाबाधित आढळून आले. जिल्ह्यात अद्याप एकूण ६० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरासह जिल्ह्यातील ग्रामिण भागात फै लावणारा कोरोना आजार वेळीच नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान आरोग्य प्रशासनापुढे उभे राहिले आहे. सिन्नर तालुक्यातील मुख्य सिन्नरसह निमगाव, दापूर, वावी गावांमध्ये बुधवारी रुग्ण मिळून आले. दापूरमध्ये सर्वाधिक पाच तर अन्य गावांमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला. बागलाणमधील अजमेरसौंदाणेमध्ये रुग्ण आढळले तर येवल्याती मुलतानपुरा भागात रुग्ण मिळून आले.शहरात बुधवारी आढळून आलेल्या रु ग्णांमध्ये रामनगर येथील मयत कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या राहुलवाडी येथील २१ वर्षीय युवकाचा समावेश आहे. तसेच पंचवटीतील महालक्ष्मी टॉकीजजवळील रु ग्णाच्या संपर्कात आलेल्या २७ व ४० वर्षीय व्यक्ती पॉझििटव्ह आल्या. तसेच नाशिकरोड येथील दत्तमंदिर परिसरातील रहिवाशी असलेल्या ३६ व १७ वर्षीय स्त्री रु ग्ण आढळून आले. त्या मुंबईहून आल्या असून त्यांचाही अहवाल पॉझटिव्ह आला. दिपाली नगर येथील ३२ वर्षीय रु ग्णाच पीपीइ किट विक्र ीचा व्यवसाय असून त्यांचे मुंबई-ठाणे या भागात नियमति प्रवास आहे. त्यांचाही अहवाल पॉझटिव्ह आला. तसेच रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये वडाळा येथील आयटी पार्क भाग, रासबिहारी शाळेजवळचा परिसर, वडाळानाका आणि नांदुरनाका परिसरात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. बुधवारी जिल्ह्यात ११२ संशियत रु ग्ण दाखल झाले आहेत. त्यात सर्वाधिक ८५ संशियत नाशिक शहरात दाखल झाले आहेत.९ हजार रुग्ण निगेटीव्ह; ४४१ अहवाल प्रलंबितसद्यस्थितीत जिल्ह्यात २५९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. प्रशासनाने बुधवारपर्यंत १० हजार ६२४ जणांची तपासणी केली असून त्यातील ९ हजार १२५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. तर १ हजार ५७ रु ग्णांचे अहवाल पॉझटिीव्ह आले आहेत. तसेच ४४१ संशियतांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.
मागील दोन दिवसांमध्ये माालेगावमध्ये कोरोनाबाधित आढळले नव्हते. प्रशासनाकडून सातत्याने सर्वेक्षणाची मोहीम सुरू आहे. यामध्ये ह्दयविकार मधुमेहाचा त्रास असलेल्या रु ग्णांची अगोदरच तापमानाची नोंद घेणार आहोत, त्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रशासनला सहकार्य करावे, जेणेकरून लवकरात लवकर मालेगावसह संपुर्ण जिल्हा कोरोनामुक्त करण्यास यश येईल.- सुरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक