नांदगाव : राष्ट्रीय लोकअदालतीत नांदगावमधून ७४ लाख रुपयांची विक्र मी वसुली होऊन ७०० प्रकरणे निकाली निघाले. महाराष्ट्रात नाशिक जिल्हा दोनवेळा अव्वल ठरला असून, नांदगावने जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. भविष्यात होणाºया लोकअदालतीस असेच सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत एस. शिंदे यांनी केले. नांदगाव वकील संघ व तालुका विधि सेवा समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर न्यायाधीश एस.बी कोºहाळे, सरकारी वकील दिवटे, ज्येष्ठ विधिज्ञ जयकुमार कासलीवाल, वकील संघाचे अध्यक्ष राजेंद्र दराडे आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विधि सेवा समिती नांदगावच्या अध्यक्ष तथा न्यायाधीश प्रेरणा दांडेकर होत्या. न्यायाधीश शिंदे पुढे म्हणाले, मागील दोनवेळा झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांच्या संख्येमुळे नाशिक जिल्हा अव्वल ठरला आहे. तीच परंपरा पुढे नेत तिसºयांदा दुप्पट प्रकरणे निकाली काढावीत. जेणेकरून आपल्याला हॅट्ट्रिक साधता येईल. नांदगावकरांकडून प्रेरणा घेता येईल, असे काम न्यायालयाकडून होत असल्याचे समाधान शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. न्यायाधीश एस. बी. काºहाळे, प्रेरणा दांडेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय बी. आर. चौधरी यांनी केले. प्रास्ताविक ज्येष्ठ विधिज्ञ जयकुमार कासलीवाल यांनी केले. सचिन साळवे यांनी सूत्रसंचालन केले. बी. आर. आढाव यांनी आभार मानले. यावेळी गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी, मुख्य अधिकारी विश्वंभर दातीर, वनक्षेत्रपाल विक्रम आहिरे, ज्येष्ठ विधिज्ञ युनूस शेख आदींसह वकील संघाचे सदस्य उपस्थित होते. तालुका विधी सेवा समिती व वकील संघ आयोजित राष्ट्रीय लोक अदालत कार्यक्रमात सहभागी असलेले शासकीय अधिकारी , विधी स्वयंसेवक, जेष्ठ विधिज्ञ , तसेच ज्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून राष्ट्रीय लोक अदालतीची जनजागृती केली. त्या विद्यार्थ्यांचा यावेळी न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
राष्ट्रीय लोकअदालतीत नांदगावमधून ७४ लाख रुपयांची विक्रमी वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 12:46 AM
नांदगाव : राष्ट्रीय लोकअदालतीत नांदगावमधून ७४ लाख रुपयांची विक्र मी वसुली होऊन ७०० प्रकरणे निकाली निघाले. महाराष्ट्रात नाशिक जिल्हा दोनवेळा अव्वल ठरला .
ठळक मुद्देनाशिक जिल्हा अव्वल ठरला लोक अदालतीची जनजागृती