प्राप्त झालेल्या लसींमध्ये ४९ हजार कोविशील्ड तर २६ हजार कोव्हॅक्सिन लस आहेत. त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिकाधिक चाचण्या करायचे निर्देश दिले तरी कोणत्याही प्रकारे लस अपुऱ्या पडू नयेत, इतक्या प्रमाणात हा स्टॉक पाठविण्यात आला आहे. महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार कठोर उपाययोजनांची अमलबजावणी आणि लसीकरणाला वेग देण्यात येणार आहे. पुढील काळात महानगरासह सर्व कापड व इतर जीवनावश्यक पुरवठा दुकानदार, मेडिकल स्टाेअर,हॉटेल मालक व त्यांचे कर्मचारी, दूधवाला, घरकाम मोलकरीण,टपरीवाले, हातगाडी वर वस्तू विकणारे,भाजीपाला व्यवस्थापक, सर्व माध्यमांचे प्रतिनिधी यांची दर आठवड्याला कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जोखिमग्रस्त सर्व घटकांनी कोरोना लसीकरण आपापल्या सोयीनुसार नजीकच्या केंद्रावर करुन घ्यावी. खाजगी दवाखान्यांनी सर्व संशयित रुग्णांची माहिती प्रशासनास तात्काळ द्यावी व चाचणीबाबत तपासणीचा आग्रह करण्यात आला आहेे. केवळ एचआरसीटी तपासणी करून सीटी स्कोअर वाढला आहे म्हणून उपचार करत शासनाची दिशाभूल करू नये.त्यामुळे सदर रुग्ण पॉझिटीव्ह असला तर त्याच्या सहवासातील व्यक्ती, संबंधित व्यक्ती प्रसार करणे सुरुच राहणार असल्याने तसे करणे टाळावे असे निर्देश देण्यात आले आहेत.
इन्फो
खरी माहिती पुरवणे बंधनकारक
जिल्ह्यातील कोरोना चाचणीत पॉझिटीव्ह असलेल्या नागरिकांनी आरोग्य विभागाला तात्काळ माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय कुटुंबातील व्यक्तींची व दरम्यानच्या काळात त्यांच्या संपर्कातील आलेल्या सर्व व्यक्तींची खरी माहिती पुरविणे आवश्यक आहे. त्या भागातील सहवासातील सर्व व्यक्तींची तपासणी करून कोरोना प्रसार तात्काळ थांबविण्याच्या उद्देशाने या उपाययोजनांची अमलबजावणी करण्यात येणार आहे.