नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाने गट क प्रवर्गातील रिक्त जागांवर पदांची भरती करण्यासाठी रविवारी (दि. १०) नाशिक जिल्हा केंद्राच्या माध्यमातून शहरातील २५ केंद्रांवर एमपीएससीची पूर्वपरीक्षा घेण्यात आली.नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी १० हजार ३७७ विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यांच्यापैकी सुमारे ७ हजार ७६५ उमेदवारांनी रविवारी ही परीक्षा दिली. २ हजार ६१२ उमेदवारांनी एमपीएससीच्या परीक्षेला दांडी मारली. जिल्हा प्रशासनातर्फे या परीक्षेसाठी ७२८ कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे किरकोळ अपवाद वगळता सर्व केंद्रांवर परीक्षा शांततेत पार पडली.
७७६५ उमेदवारांनी दिली एमपीएससीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 1:18 AM