लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी महापालिकेतील सर्व लोकप्रतिनिधी निमासोबत आहेत, मोठा उद्योग प्रकल्प येण्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करू आणि आपल्या प्रभागातील ८० एकर जमीन आयटी पार्कसाठी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन महापौर रंजना भानसी यांनी दिले. निमाच्या वतीने मेक इन नाशिक उपक्रमाच्या तयारी आणि नियोजनासाठी निमात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. मेक इन नाशिक उपक्र मांतर्गत एक तरी मोठा उद्योग प्रकल्प नाशिकला आला पाहिजे. तरच नाशिकचा सर्वांगीण विकास होणार आहे. दि. २८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यावेळी महापालिकेतील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मोठ्या उद्योग प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांना सामूहिक निवेदन देण्यात येणार असल्याचेही महापौर भानसी यांनी यावेळी सांगितले. स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनीही निमाच्या मेक इन नाशिक उपक्रमासाठी सर्वप्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नगरसेवक दिनकर पाटील यांनी सांगितले की, मोठा उद्योग प्रकल्प आणण्यासाठी मेक इन नाशिक हा चांगला उपक्र म हाती घेतला आहे. या उपक्र माच्या प्रसिद्धीसाठी प्रभाग क्र मांक ९ मधील नगरसेवकांच्या वतीने शहरात ४० फलक लावण्यात येतील, असे आश्वासन दिले. नगरसेवक कोमल मेहरोलिया यांनी सांगितले की, आपल्या शहरातील युवकांच्या हुशारीचा बाहेर वापर करून घेतला जात आहे. या युवकांना नाशिकमध्येच रोजगार उपलब्ध करून दिल्यास शहराचा अधिक विकास होईल. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि निमा यांनी सामूहिक प्रयत्न केला पाहिजे. नगरसेवक शशिकांत जाधव यांनी सांगितले की,‘मेक इन नाशिक’ उपक्रमात सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहून मुख्यमंत्र्यांकडे मोठ्या उद्योग प्रकल्पाची मागणी करावी. यावेळी सातपूर प्रभाग सभापती माधुरी बोलकर, तसेच डॉ.वर्षा भालेराव, रवींद्र धिवरे, हेमलता कांडेकर, अलका अहिरे, दीपक दोंदे, हेमलता पाटील आदी नगरसेवक उपस्थित होते. प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी केले. मेक इन नाशिक प्रकल्पाचे अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर यांनी या उपक्रमाची माहिती दिली, तर सरचिटणीस उदय खरोटे यांनी प्रकल्पाचे नियोजनाचा आढावा सादर केला. यावेळी मंगेश पाटणकर, मनीष कोठारी, संजीव नारंग, आशिष नहार, सुरेश माळी, हर्षद ब्राह्मणकर, किरण खाबिया, मनीष रावल, सुधीर बडगुजर, संदीप भदाणे, सुनील जाधव, मंगेश काठे, उन्मेष कुलकर्णी, अनिल बाविस्कर, उदय रिकबे, कैलास अहिरे आदिंसह उद्योजक निमा पदाधिकारी उपस्थित होते.
‘आयटी पार्क’साठी ८० एकर जागा
By admin | Published: May 23, 2017 1:07 AM