नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. ४) एकूण ८० नवीन बाधित झाले असून, ९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मनपा क्षेत्रात एका नागरिकाचा मृत्यु झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८५२४ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात नव्याने बाधित झालेल्या रुग्णांमध्ये ३८ नाशिक मनपा तर ३७ नाशिक ग्रामीण क्षेत्रातील असून, मालेगाव मनपात १, तर जिल्हाबाह्य ४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रलंबित रुग्णांची अहवाल संख्या १२२३ वर पोहोचली आहे, तर कोरोनामुक्तचे प्रमाण ९७.६२ टक्के आहे. सध्या उपचारार्थी रुग्णांची संख्या १०५२ वर पोहोचली आहे.