नईम सादिक सय्यद (रा. महाराष्ट्र हौसिंग कॉलनी) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शनिवारी (दि. २६) रात्री सय्यद यांच्या घराचा दरवाजा अनवधानाने उघडा राहिला होता. ही संधी साधत चोरट्याने प्रवेश करून कपाटातून सुमारे ७९ हजार २०० रुपये किमतीचे दागिने गायब केले.
----
तडीपार गुंड सोन्याला बेड्या
नाशिक : शहर व जिह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केलेले असतानाही शहरात राजरोसपणे फिरणाऱ्या तडीपार गुंडाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पेश ऊर्फ सोन्या मनोज झगडे (२२, रा. भंडारी बाबा चौक, कुंभारवाडा) असे अटक केलेल्या संशयित तडीपार गुंडाचे नाव आहे. झगडेचा शहरात वावर असल्याची गुप्त माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि. २८) त्याच्या घराच्या परिसरात सापळा रचला.
---
दोन दुचाकी चोरट्यांनी केल्या गायब
नाशिक : शहरात मोटरसायकली चोरीची मालिका सुरूच असून, नुकत्याच दोन मोटरसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. या प्रकरणी इंदिरानगर आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरानगर भागात राहणारे भुवानंद जराप्पा बंगेरा (रा. श्री इम्पेरियल अपा. सिटी गार्डनजवळ) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बंगेरा यांची शाईन दुचाकी (एमएच १५ सीझेड ५२७५) रविवारी (दि. २७) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असताना चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास जमादार हादगे करीत आहेत, तर नाशिकरोड येथील मयूर दिलीप आंबेकर (रा. सिद्धेश्वर कॉलनी, पॉलिटेक्निक कॉलेजजवळ) यांची दुचाकी (एमएच १५ जीके ५५०९) रात्री बिटको पॉइंट येथील स्कायलाइन टॉवर या इमारतीखाली पार्क केलेली असताना चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लिफ्ट बॅटऱ्यांची चोरी
नाशिक : सोसायटीमधील लिफ्टच्या बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना राजीवनगर येथे घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवेंद्र गोपाळ झोडगेकर (रा.रुंग्ठा रेसि.अपा.स्प्लेंडर हॉलमागे) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रुंग्ठा रेसिडेन्सी या सोसायटीच्या लिफ्टसाठी बॅटरी बॅकअपसाठी लावण्यात आलेल्या सुमारे २० हजार रुपये किमतीच्या सहा बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या. अधिक तपास पोलीस नाईक जावेद खान करीत आहेत.