सिडको : मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा राणेनगर सिडको येथील हिंदी कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण ८१ टक्के निकाल लागला. त्यामध्ये विज्ञान शाखेचा ९४.४५ टक्के, हिंदी संयुक्त शाखेचा ७५ टक्के निकाल लागला आहे.वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या राणेनगर येथील हिंदी कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत माधुरी जायभावे ८२टक्के गुण मिळवून प्रथम आली. जिगर जोशी द्वितीय (८१ टक्के), तर संयुक्त शाखेत चेतना प्रजापती ७८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. विद्यार्थ्यांचा संस्थेचे सरचिटणीस तानाजी जायभावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य के. टी. उगलमुगले, उपप्राचार्य बी. ए. नागरे, भगवान जायभावे, देवरे आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.मखमलाबाद महाविद्यालयाचा निकाल ९७.२८ टक्केनाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एच.एस.सी. परीक्षेचा निकाल ९७.२८ टक्के लागला असून, आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या कॉलेजमधील ४०५ विद्यार्थी परीक्षेस बसलेले होते, त्यापैकी ३९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
राणेनगर शाळेचा ८१ टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:20 AM