लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील कोरोना रु ग्णसंख्या आता २५ हजार २८८ इतकी झाली आहे. सोमवारी (दि. १७) उपचारार्थ दाखल १५ रुग्ण दगावले. यामध्ये मनपा हद्दीतील ५, मालेगावातील २, ग्रामीणमधील आठ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १९ हजार ९५१ रु ग्णांनी आतापर्यंत यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यत सोमवारी ८३१ नवे रुग्ण आढळून आले. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारी जिल्ह्यात एक हजार ६५ संशयित रु ग्ण दाखल झाले.कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. आगामी काळ सण-उत्सवांचा असल्याने संक्र मणाचा धोका वाढणार असल्याचे बोलले जात आहे.सोमवारी नाशिक ग्रामीणमध्ये १६८, शहरात ५८७ तर मालेगावात ७४ कोरोनाचे रु ग्ण आढळून आले. नाशिक मनपा हद्दीत ७२४ संशयित आढळून आले. जिल्ह्यात आतापर्यंत ७०४ बाधितांचा मृत्यू झाला, तर चार हजार ६३३ बाधितांवर उपचार सुरू आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसून दररोज सुमारे ५०० नवीन बाधित आढळून येत आहेत. जिल्ह्यातील १ हजार १९८ अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.