दिंडोरी : येथील नगरपंचायतीचा २००८ / १९ साठीचा सुमारे ८४ कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. नगराध्यक्ष प्रमोद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा झाली. मुख्याधिकारी अनंत जवादवार यांनी अर्थसंकल्प सादर केला . त्यात शहरात विविध नागरी सेवा सुविधा विकासकामांवर भर देण्यात आला असून केंद्र व राज्य शासनाच्या अनुदान योजना तसेच जिल्हा नियोजन विकास मंडळ आदींच्या माध्यमातुन ७५ कोटी ८७ लाखांच्या विकासकामे प्रस्तावित करण्यात आली आहे. नगर पंचायतीच्या धीतून प्रशासनसाठी ९२ लाख ७६ हजार , दिवाबत्ती साठी १०.५ लाख, पाणीपुरवठा ३६ लाख, आरोग्यसाठी २५ लाख ५५ हजार, बांधकामासाठी १ कोटी ३७ लाख आदी तरतूद करण्यात आली. उत्पन्न वाढीचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी नगरसेवकांनी सूचना केल्या. यावेळी भाऊसाहेब बोरस्ते यांचेसह विविध विषय समिती सभापती, सर्व नगरसेवक उपस्थित होते.
दिंडोरी नगरपंचायतीचा ८४ कोटींचा अर्थसंकल्प सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:10 AM