नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर करण्यात आला असून, नाशिक विभागातून यावर्षीही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्ये नाशिक विभागातून ९२ हजार ०६४ मुले, तर ६७ हजार ८३३ मुली असे एकूण १ लाख ५९ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ८१.५१ टक्के मुले, ८९.१९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णत्तेचे प्रमाण ७.६८ टक्क्यांनी अधिक असल्याने बारावीच्या निकालात यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. विभागातील नाशिक जिल्ह्यातील ९० परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून ४१७ महाविद्यालयातील ७९ हजार ८५४ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ८४.१६ टक्के म्हणजे ५९ हजार ६२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर धुळे जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के लागला आहे. येथे ४४ केंद्रांत २४ हजार १९३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २० हजार २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जळगावमधून सर्वाधिक ८६.६१ टक्के निकाल लागला आहे. येथील ७१ परीक्षा केंद्रांवरून ४८ हजार ६१८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४२ हजार १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नंदुरबारच्या २३ केंद्रांवर १६ हजार २४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी १३ हजार ६१४ म्हणजे ८३.८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.निकालासह कॉपीमध्येही जळगाव प्रथम नाशिक विभागातून बारावीच्या परीक्षेत जळगावचे सर्वाधिक ८६.६१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र परीक्षेदरम्यान सर्वाधिक १२६ कॉपी केसेस जळगावमध्येच झाल्या आहेत. त्यामुळे जळगाव उत्तीर्णतेच्या निकालासोबतच कॉपीप्रकरणामध्येही प्रथम असल्याचे दिसून आले आहे. बारावीच्या परीक्षेत नाशिक जिल्ह्यात १३, धुळे १० तर नंदुरबारमध्ये केवळ ५ कॉपी प्रकरणे आढळली होती. त्या तुलनेत जळगावमधील गैरमार्गाची प्रकरणे नाशिक विभागीय मंडळाला आत्मचिंतन करायला लावणारी आहेत.
नाशिक जिल्ह्यातून ८४.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण ; विभागात मुलींचीच बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 7:34 PM
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर करण्यात आला असून, नाशिक विभागातून यावर्षीही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्ये नाशिक विभागातून ९२ हजार ०६४ मुले, तर ६७ हजार ८३३ मुली असे एकूण १ लाख ५९ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ८१.५१ टक्के मुले, ८९.१९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णत्तेचे प्रमाण ७.६८ टक्क्यांनी अधिक असल्याने बारावीच्या निकालात यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे.
ठळक मुद्देनाशिक विभागातून बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी ८१.५१ टक्के मुले, ८९.१९ टक्के मुली उत्तीर्ण