नाशिक : पर्यटन व अभ्यास दौऱ्यासाठी टर्कीला (तुर्कस्तान) जाणाºया इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक शाखेच्या ७७ डॉक्टरांची सहल टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीने अचानक रद्द करून जमा केलेली ८५ लाख रुपयांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी रोवरकेशन हॉलिडे कंपनीचे प्रतिनिधी संशयित अमित किशोर शहा (३४, रा. बी-३०४, अशोका रॉयल, अशोका मार्ग, नाशिक) यांना अटक केली आहे़ आयएमएचे अध्यक्ष डॉ़ आवेश चंद्रकांत पलोड (रा. सुमती सोसायटी, शास्त्रीनगर, शरणपूररोड) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संस्थेचे सदस्य त्यांचे कुटुंबीय असे एकूण ७८ सदस्य (डॉक्टर) पर्यटन व अभ्यास दौºयासाठी टर्की येथे जाणार होते़ यासाठी कॉलेजरोडवरील युनिटी पार्कसमोरील रोवरकेशन कंपनीने प्रत्येक डॉक्टरकडून एक लाख ११ हजार रुपये प्रवासाचा खर्च घेतला़ जुलै ते २९ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत ट्रॅव्हल्स कंपनीने डॉक्टरांकडून एकूण ८५ लाख रुपये जमा केले़ ट्रॅव्हल कंपनीचे प्रतिनिधी संशयित अमित शहा यांनी डॉ. पलोड यांना फोन करून सहल परवडत नसून आणखी ८० पर्यटक व प्रतिसदस्य आणखी ३० हजार रुपयांची मागणी केली तसेच सहल निघणार नसल्याचे सांगितले़ या कारणावरून पलोड व शहा यांच्यामध्ये शाब्दिक चकमकही झाली़ यानंतर आयएमएच्या डॉक्टरांची बैठक होऊन सरकारवाडा पोलीस ठाण्यात कंपनीचे प्रतिनिधी शहा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला़आयएमएला नोटीससहलीची तारीख अवघ्या १० ते १२ दिवसांवर आलेली असताना कंपनीने फसवणूक करण्याच्या उद्देशाने ठरविलेल्या पैशांमध्ये सहल नेणे परवडणारे नसल्याची नोटीस आयएमएला पाठविली़ तसेच जमा केलेले ८५ लाख रुपयेही परत केले नाही़
आएमएतील ७८ डॉक्टरांची ८५ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:51 AM