नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने जागा देण्यास शेतकºयांचा प्रतिसाद मिळू लागल्याने प्रशासनाला हायसे वाटू लागले असून, पितृपक्ष आटोपताच शेतकºयांनी पुढे येत जवळपास ८७.१७ हेक्टर जागेची खरेदी अधिकाºयांना दिली आहे. आजवर जवळपास ९९ कोटी रुपये शेतकºयांच्या बॅँक खात्यांवर टाकण्यात आले आहेत.सुरुवातीपासूनच विरोध होणाºया समृद्धी महामार्गासाठी सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतील काही शेतकºयांचा एकीकडे जागा न देण्यासाठी न्यायालयीन लढा सुरू असताना दुसरीकडे शेतकºयांचे मन वळविण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांनाही चांगले यश मिळू लागले आहे. मात्र गणेशोत्सव व त्यानंतर पितृपक्ष आल्याने जवळपास जागा खरेदीचे काम थंडावले होते. शेतकºयांकडून फक्त किती मोबदला मिळेल याचीच विचारणा केली जात होती. त्यातही ज्या शेतकºयांनी जागा देण्याची तयारी दर्शविली त्यांच्या जागेचे स्वतंत्र मूल्यांकन करण्यास यंत्रणेलाच वेळ लागत होता. मात्र पितृपक्ष संपताच शेतकºयांनी थेट खरेदीने जागा देण्याची तयारी दर्शविल्याने प्रशासनाने त्याची खरेदी केली आहे. विशेष म्हणजे सिन्नर तालुक्यात समृद्धी महामार्गाला सर्वाधिक विरोध झालेला असताना या तालुक्यातील १३ गावांमधील शेतकºयांनी आजवर जागा दिली आहे. त्यामानाने इगतपुरी तालुक्यातील दहा गावांतील शेतकरी जागा देण्यासाठी पुढे आले आहेत. २३४ शेतकºयांकडून जागा घेण्यात आली असून, त्यात सिन्नर तालुक्यातील १४२ व इगतपुरीच्या ९२ शेतकºयांचा समावेश आहे. सिन्नर तालुक्यातील ५९.४७ हेक्टर व इगतपुरीतून २७.७० हेक्टर अशा प्रकारे ८७.१७ हेक्टर जागा खरेदी करण्यात आली आहे. त्यासाठी ९९.४० कोटी रुपये शेतकºयांच्या खात्यावर टाकण्यात आले आहेत. दिवाळीपर्यंत आणखी शेतकरी पुढे येतील असे सरकारी अधिकाºयांचे म्हणणे आहे.
समृद्धीसाठी ८७ हेक्टरची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:54 PM