नाशिक : जिल्ह्णात आतापर्यंत सुमारे ८७.८० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचे बव्हंशी काम पूर्ण केले असले तरी जुलैच्या उत्तरार्धात मात्र पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची बरीच पिके संकटात आली असून, शेतकºयाला आता खरिपाची पिके वाचविण्यासाठी चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.नाशिक जिल्ह्णात यंदाच्या खरीप हंगामात ५ लाख ७५ हजार ५९१ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी पाच लाख ५ हजार ३७५ हेक्टर म्हणजेच सुमारे ८७.८० टक्के क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली असून यात ३ लाख ५४ हजार ९२९ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्याची पेरणी करण्यात आली आहे. यात भात, ज्वारी, बाजरी, नागली, मका या पिकांसह चार हजार ३८४ हेक्टर क्षेत्रावरील अन्य तृणधान्य प्रकारातील पिकांचा समावेश आहे. तर जवळपास ३२ हजार ८६४ हेक्टर क्षेत्रावर तूर, उडीद, मूग यांसारख्या कडधान्य पिकांसह तीन हजार ४७७ हेक्टर क्षेत्रावरील अन्य कडधान्य पिकांचा समावेश आहे.जिल्ह्णात यावर्षी सुमारे ७६ हजार ३५६ हेक्टर क्षेत्रावर भुईमूग,सूर्यफूल, तीळ, सोयाबीन, खुरासणीसह ८१५ हेक्टरवरील अन्य गळीत धान्य पिकांची पेरणी झाली आहे. यातील बहुतेक पेरणी जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत झालेल्या पावसामुळे शक्य झाली असून, जुलैच्या उत्तरार्धात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.पेरणीची कामे जवळपास पूर्ण होत आलेली असताना अनेक भागात पिकांतर्गत मशागत सुरू असून, पिकांच्या चांगल्या वाढीसाठी शेतकºयांना आता चांगल्या पावसाची गरज आहे. कापसाची ९० टक्के लागवड नाशिक जिल्ह्णात सुमारे ४५ हजार ५२१ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात येते. त्यापैकी ४१ हजार २२६ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच जवळपास ९०.५६ टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. परंतु राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकºयांना भेडसावणारी बोंडअळीची समस्या नाशिक जिल्ह्णातील शेतकºयांसमोरही असून, पावसाने ओढे दिल्याने शेतकºयांसमोर सिंचनासोबतच रोगांचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
जिल्ह्यात ८८ टक्के पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:44 AM
नाशिक : जिल्ह्णात आतापर्यंत सुमारे ८७.८० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचे बव्हंशी काम पूर्ण केले असले तरी जुलैच्या उत्तरार्धात मात्र पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची बरीच पिके संकटात आली असून, शेतकºयाला आता खरिपाची पिके वाचविण्यासाठी चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
ठळक मुद्देखरिपाला पावसाची प्रतीक्षा : ८७.६६ टक्के अन्नधान्य, तर ८७.३८ टक्के गळीत धान्य